Why Should Wife Sleep Left Side Of Husband : आपल्या शास्त्रांमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. घरातल्या कोणत्या वस्तू कुठे असाव्या इथ पासून ते पती पत्नीतील नातेसंबंध चांगले रहावे यासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आले आहे. ज्याचा फायदा शारीरिक मानसिक आरोग्य, घरातील वातावरण अशा बऱ्याच गोष्टींसाठी होतो.
त्याचप्रमाणे पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे असे सांगण्यात आले आहे. यामुळे होणारे फायदे जाणून घेऊया.
नातेसंबंध आणि आरोग्यावर परिणाम - पत्नीने पतीच्या डाव्या बाजुला झोपण्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. शिवाय त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.
आजारपणाचा धोका होतो दूर - सर्वांची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहींना उजव्या बाजूला झोपायला आवडते तर काहींना डाव्या बाजूला. पण डाव्या बाजूला झोपणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.
बेस्ट पोझीशन - आयुर्वेदात महिलांनी डाव्या बाजूला झोपणे चांगले असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. या स्थितीत झोपल्याने बरेच अवयव चांगले काम करतात.
घोरण्याची सवय - जर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. डाव्या बाजूला झोपल्याने तुमच्या नाकाचा मार्ग खुला राहतो आणि घोरण्याची प्रक्रिया कमी होते.
पचनक्रियेत सुधारणा - महिलांनी डाव्या बाजूला झोपल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पोहचतात. यामुळे पचन क्रिया सुधारते. पोटाच्या समस्या दूर होतात.
निरोगी हृदय - डाव्या बाजूला झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. या स्थितीत झोपल्याने हृदयावर कोणताही दबाव येत नाही. तर उजव्या बाजूला झोपण्याचा थेट परिणाम हा हृदयावर होतो.
कंबरदुखी - महिलांना कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास सतावत असतो. अशा स्थितीत डाव्या बाजूला झोपल्याने तुम्हाला या समस्येपासून काहीसा आराम मिळू शकतो.
गरोदर महिलांना फायदा - गरोदर महिलांनी डाव्या बाजूला तोंड करून झोपणे चांगले मानले जाते. या स्थितीत झोपल्याने गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होतो.
छातीत जळजळ - जर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल तर या स्थितीत झोपणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
डाव्या बाजूला कसे झोपावे? - डाव्या बाजूला झोपण्यासाठी चांगली उशी घ्या. ही उशी आपल्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवा. दुसरी उशी डोक्याखाली ठेवा आणि आपले दोन्ही खांदे एकमेकांना समांतर स्थितीत ठेवा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.