Astro Tips Mangal Dosh esakal
संस्कृती

Astro Tips Mangal Dosh : जन्म पत्रिकेतला मंगळ नायक की, खलनायक? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या

कोणाच्या जन्म पत्रिकेत मंगळ असेल तर तो नेहमीच वाईट असतो असा समज असतो, सत्य जाणून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

Mangal Dosh In Janma Patrika Good Or Bad :

मुलीच्या किंवा मुलाच्या जन्म पत्रिकेत मंगळ दोष असला की, त्यांचा विवाह जुळत नाही किंवा जुळण्यात वेळ लागतो असा एक समज पसरलेला आढळतो. पण पत्रिकेतला हा मंगळ कायमच वाईट असतो का? हा मंगळ वैवाहिक जीवनात तीव्र असंतोष निर्माण करतो का? जर मुलाला मंगळ असेल तर त्याला विदुरत्व किंवा मुलीला मंगळ असेल तर ती विधवा होईल का? अशा एक ना अनेक शंका या एका ग्रहाच्या भोवती लोकांच्या मनात येतात.

हे समज आहेत की, गैरसमज, नक्की हा मंगळ एवढे अमंगळ करतो का याविषयी जाणून घेऊया खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांच्याकडून.

पत्रिकेत मंगळच का बघतात?

लग्न जुळवताना पत्रिकेतला मंगळच का बघितला जातो? शनि किंवा इतर ग्रह का बघितले जात नाही, याचा विचार करायला हवा.

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्नी तत्वाचा, क्षत्रिय वर्णाचा आणि अतिशीघ्र फळ देणारा असा पाप ग्रह सांगितला आहे. त्या मानाने शनि इत्यादी जे पाप ग्रह सांगितले आहेत ते मंद प्रकृतीने फळ देणारे किंवा त्यांचा परिणाम उशीरा होतो.

मंगळ अतिशीघ्र परिणाम दाखवतो.

पत्रिकेतील मंगळावरून काय समजते?

  • पराक्रम

  • गंभीर आजार

  • भावंडांचे सौख्य

  • प्रतिष्ठा

  • गुणी-अवगुणी

  • वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी

एखादी व्यक्ती मांगलिक असल्याचे कसे ओळखतात?

  • मंगळ असणे वाईट नसते,

  • उलट या व्यक्ती कर्तृत्ववान असतात.

  • धाडसी आणि लवकर निर्णय घेणाऱ्या असतात. त्यामुळे फक्त मंगळ आहे म्हणून अशा पत्रिका टाळू नये.

मग काय बघणे आवश्यक?

  • लग्न स्थान, चतुर्थ स्थान, सातव्या स्थानी, आठव्या स्थानात आणि बाराव्या स्थानात जर मंगळ असेल तर त्यांना मंगळ आहे असे म्हटले जाते.

  • पुरुषांच्या पत्रिकेत लग्नापासून, शुक्रापासून आणि चंद्रापासून मंगळाचे स्थान बघितले जाते.

  • तर महिलांच्या पत्रिकेत लग्नस्थानापासून आणि चंद्र कुंडली म्हणजे राशी कुंडलीपासून मंगळाचा विचार करावा लागतो.

  • जर दोघांना मंगळ असेल तर ते दोघे लग्न करू शकतात.

  • पण मुलीच्या किंवा मुलाच्या पत्रिकेत ज्या स्थानावर मंगळ असेल त्याच स्थानी जोडिदाराचा मंगळ असणे आवश्यक असते.

मंगळ दोष कधी नष्ट होतो?

  • प्रथम स्थानात मंगळ राशीचा मंगळ असणे

  • बाराव्या स्थानात धनु राशीचा मंगळ असणे

  • चौथ्या स्थानात वृश्चिक राशीचा मंगळ असणे

  • विवाह स्थानामध्ये मकर राशीचा मंगळ असणे

  • अष्टम स्थानामध्ये कर्क राशीचा मंगळ असणे

मंगळ दोषाच्या निवारणाचे उपाय

  • पत्रिकेचा नीट अभ्यास करूनच उपाय करणे आवश्यक आहे.

  • कुंभ विवाह

  • विष्णू प्रतिमा दान

  • सावित्री व्रत यांचा अवलंब करावा.

  • मुलाच्या बाबतीत रुईच्या झाडाशी विवाहाचा उपाय सांगितला जातो. पण शास्त्रात हा उपाय दोन पत्नींचे निधन झाल्यावर तिसऱ्या लग्नाच्या आधी करण्यास सांगितला जातो. पहिल्याच लग्नाच्या आधी हा उपाय करू नये.

  • मुलासाठी दुर्गाग्नीविष्णू होम करणे उपयुक्त ठरते.

  • शिवाय पत्रिका बघून त्या त्या ग्रहांची स्थिती बधून उपाय सांगता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT