बैलपोळाच्या आदल्या दिवशी म्हणजे खांदा मळनीच्या दिवशी गाईच्या दुधात हळद टाकुन त्याचा लेप बैलाचा खांदयाला लावून त्यांची मसाज केली जाते. वर्षेभर कुणबीकीचे जो खांदा वर्षेभर ओझ वाहतो त्या बैलराजाच्या खांद्याला त्यादिवशी आराम असतो.
विदर्भातील बऱ्याच या दिवशीच पळसाच्या पानाचा डगळा आणि मोळाच गवत यांची वेणी गुंफून त्याचे चवरे तयार केले जाते अन बैलाच्या शिंगाला बांधले जाते एक म्हण आहे पळसाला पान तिनच पण श्रावण महिन्यात पळसाला पाच पानं लागतात म्हणुन त्याचा मान असतो.
माझ्या गावात पोळा दोन तिन दिवस राहिला की अमावस्या मागणारी बनामाय पळसांच्या पान व मोळयाचं गवत याची जुडी घरोघरी वाटते अन त्याच्या बदल्या पसाभर गहु ती घेऊन जाते.
हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवस बैलपोळाचा उगवतो. त्या दिवशी बैलाला नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घालुन , सजवलं जातं. अंगावर झुल टाकतात, शिंगाना रंग लावला जातो. गळयात घागर माळा, कवडीच्या माळा, घंटया घालतात . संध्याकाळी सजवलेला बैल पोळयात नेण्याआधी त्यापुर्वी त्याला ग्रामदेवतेच दर्शन करायला नेतात. जिथे पोळा भरतो तिथे गावातील सर्व बैल येतात. एक मोठे तोरण लावलेले असते त्या खाली सर्व बैल उभे राहतात.
बैलाची पुजा झाल्यावर झडती ( एक प्रकारचे लोकगीत ) म्हणतात
आभाळ गड गडे, शिंग फडफडे,
शिंगाला पडले नऊखडे,
नऊ खड्याच्या नऊ धारा,
बैल गेला पाऊन खडा ,
पाऊन खड्याची आणली माती,
ती दिली पार्वतीच्या हाती,
पार्वतीने घडवली,
माझ्या बैलाची शिंगशिगोटी,
एक नमन कवडा , बोला हरहर महादेव.
अश्या वेगवेगळया प्रकारच्या झडत्या लोक म्हणतात .
यानंतर गावातील पाटील, पंच मंडळी मानाची जोडी निवडतात. आणि ज्याची जोडी निवडली गेली त्याच्या घरी सर्व गावातील मंडळी साठी चहापाण्याचा कार्यक्रम असतो. घरी महिला मंडळी भावाच्या पाठीवर काकडी फोडतात. व त्यातील बिया अंगणात , घरात टाकतात. पोळयात गेलेल बैल गावात घरोघरी जातात. घरी येणाऱ्या प्रत्येक बैलाची घरातील बाई मनोभावे पुजा करते नंतर बैलाचे गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि मग बैलराजाला पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालते. अश्या प्रकारे मोठ्याचा बैल पोळा साजरा होतो.
तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. हा दिवस लहानाचा असतो. ज्याप्रकारे मोठया बैलाचा पोळा भरतो त्याप्रमाणे लहान मुलंही आपले मातीचे , लाकडी बैल घेऊन येतात. गावी हा तान्हा पोळा आमच्या कडून आयोजीत व्हायचा सकाळ पासून लगबग सुरु असायची. घरची पुरुष मंडळी गावातील मुलाना हाताशी घेऊन तोरण बांधणे , पुजेची तयारी करणे सुरु असते. सर्व गावातील मुलं आपले मातीचे बैल घेऊन तोरणाखाली उभे असतात. सर्व बैलाची पुजा होते . मुलांना बिस्कीट पुडे व पैसे दिले जातात.येथेही मोठ्या बैल पोळ्या प्रमाणे एक मानाची जोडी काढली जाते. व मानाची जोडी असते त्याच्या घरी गावातील सर्वासाठी चहापाण्याचा कार्यक्रम असतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.