वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पक्षांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशी येतात. तर संपूर्ण वर्षभरामध्ये २४ एकादशी येतात. या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्या दिवशी उपवास सोडला जातो.
तूम्ही कॅलेंडर पाहिले असेल तर आज स्मार्त एकादशी आणि उद्या भागवत एकादशी आली आहे. भागवत आणि स्मार्त एकादशी यात बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. नेमकी कोणती एकादशी करावी हे समजत नाही. त्यामुळे स्मार्त आणि भागवत एकादशीतील फरक जाणून घेऊयात.
वारकरी संप्रादयामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.
स्मार्त एकादशी
जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो, आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्यादिवशी एकादशीचा क्षय असतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे समजतात.जर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
एकादशीचे व्रत हे श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. मात्र स्मार्त लोक म्हणजे ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास असलेले, तपश्रर्या करणारे असे ऋषि मुनि, आचार्य हे स्मार्त एकादशीचे व्रत करतात. ज्यांना वैदिक ज्ञान आहे हे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात तेही स्मार्त एकादशीचा उपवास करतात.
भागवत एकादशी
एकादशीचा उपवास हा तीन दिवसांची असते. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीस हा केवळ एक वेळ जेवण्याची अशी प्रथा आहे. तर एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर कडकडीत उपवास करून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीस सूर्य उगवल्यानंतर अन्नसेवन केले जाते.
ज्या दोन एकादशी आहेत, सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी 96 मिनिटे आधी दशमी तिथी संपली तर पुढे येणारे तिथीस एकादशी म्हणून ओळखली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.