Champa Shashti esakal
संस्कृती

Champa Shashti : चंपाषष्ठीला तळी भरलीच पाहीजे; जाणून घ्या संपुर्ण विधी

सकाळ डिजिटल टीम

Champa Shashti : मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत खंडोबाचा षड्ररात्रोत्सव साजरा केला जातो. ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात. यंदा 29 नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे. मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत आहे. त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमीत्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते. चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी, तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया.

(Champa Shashti celebration in Margashirsha Khandoba Malhari Tali importance and Significance)

चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरोघरी तळी भरतात.

तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य

कुळातील खंडोबा देवाचा टाक

विड्याची पाने - 11

सुपारी - 5

खोबरे वाटी - 2

तांब्याचा कलश - 1

तांब्याचे ताम्हण - 1

भंडार (हळद)

कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी

बसायला आसन

दिवा, अगरबत्ती

चंपाषष्टी देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, भाकरी, पातिचा कांदा, लसूण असा नैवेद्य अर्पण करतात.

तळी भरण्यासाठी काय तयारी करावी?

तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात. त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर तांब्याचा कलशात पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी. ताम्हणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक अन् भंडारा ठेवावा. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

तळी

अशाप्रकारे तळी भरावी

तळी भरण्यासाठी तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी बसावे. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून 'येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट' असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे. त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने (शक्यतो कुटुंब प्रमुखाने) डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी अन् त्यावर ताम्हण ठेवावे. देवाला भंडार अर्पण करुन प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावावा. आणि पुन्हा एकदा 'सदानंदाचा येळकोट' या गजरात ताम्हण उचलावे. शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे.

ताम्हण वरखाली करताना 'सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयजयकार करावा. हे करताना खंडोबाची आरती म्हणावी.

तळी भरतेवेळी म्हणावी ही आरती

बोल खंडेराव महाराज की जय॥

सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय म ल्हार॥

हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥

भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥

सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥

निळा घोडा॥ पाई तोडा॥

कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥

गळयात कंठी॥ मोहन माळा॥

अंगावर शाल॥ सदा हिलाल॥

जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥

म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥

देवा ओवाळी ॥ नाना परी॥

देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥

खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥

बोल सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥

माहिती संकलन - विजय राजेंद्र जोशी गुरुजी, नाशिक (ज्योतिष अभ्यासक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT