आचार्य चाणक्य यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाणक्याचे तत्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. अनेकजण चाणक्य यांच्या नितीचा अवलंब करतात आणि जीवनात भरघोस यश मिळवतात.
माणसाचा स्वभाव आणि त्याचे गुण त्याला चांगले आणि वाईट बनवतात. गरीब असो वा श्रीमंत, त्या व्यक्तीचे गुण चांगले असतील तर त्याचा सर्वत्र आदर होतो. चाणक्य नीतीमध्ये यासंदर्भातच सांगितले आहे. काही गोष्टी स्वीकारताना कधीही संकोच करू नका, असे चाणक्य निती म्हणतात. चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहे? (Chanakya Niti said don't hesitate to accept these four things read here)
1. चाणक्याने सांगितले आहे की, माणसाने अमृतातून विष बाहेर काढावे, म्हणजे वाईटात चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुमच्या विचारात सकारात्मकता येईल आणि प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची तुमची क्षमता वाढेल.
2. चाणक्य निती म्हणते,निम्न वर्गात जन्मलेल्या व्यक्तीकडून ज्ञान घेण्यास कधीही संकोच करू नका. हुशार माणसाचे जात-धर्म बघू नका. ज्ञान जिथे मिळेल, तेथून घेतले पाहिजे.
3. चाणक्यने सांगितले आहे की, सद्गुणी मुलीचा नेहमी आदर करा.दृष्ट कुंटूबात जन्मलेल्या मुलीला स्वीकारा. तिच्यातल्या चांगल्या गोष्टी पहा. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. वाईट शोधण्यापेक्षा त्याच्यात चांगले गुण शोधा.
4. चाणक्य निती म्हणते, आपल्या मुलांना नेहमी सर्वोत्तम शिक्षण द्या. मित्रांना धार्मिक कार्य करण्यास प्रोत्साहन द्या. असं करणाऱ्यास नक्कीच यश मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.