Chandra Grahan esakal
संस्कृती

Chandra Grahan : ग्रहणातही करता येईल लक्ष्मी, इंद्राची पूजा

कोजागरिचे दूध केवळ तीर्थ म्हणून पळीभरच प्यावे, असे शास्त्रात सांगितल्याचे खगोल शास्त्राभ्यासक व ज्योतीषाचार्य सूर्यकांत मुळे यांनी माहिती दिली

सकाळ ऑनलाईन टीम

Chandra Grahan : आश्विन शुद्ध पौर्णिमेला उत्तररात्री खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. कोजागरिचा कुलाचार असल्याने ग्रहण काळातही लक्ष्मी व इंद्राची पूजा करता येईल. तसेच नैवेद्य देखील दाखवता येईल. पण, कोजागरिचे दूध केवळ तीर्थ म्हणून पळीभरच प्यावे, असे शास्त्रात सांगितल्याचे खगोल शास्त्राभ्यासक व ज्योतीषाचार्य सूर्यकांत मुळे यांनी माहिती दिली.

पौर्णिमेला कौमुदी म्हणतात. त्यामुळे लक्ष्मी व ऐरावत हत्तीवर बसलेल्या इंद्राची पूजा केल्याने लक्ष्मी, धनप्राप्ती, ऐश्वर्य प्राप्ती होते, असेही हिंदू धर्म शास्त्रात सांगितले आहे. ता. २८ च्या उत्तररात्री म्हणजे २९ तारखेच्या पहाटे ०१ : ०५ मिनीटांनी ग्रहणाची सुरुवात होईल. ०१ : ४४ मिनीटांनी ग्रहणाचा सर्वोच्च काळ तर मोक्षकाळ ०२ :२३ मिनीटांनी आहे. ग्रहणाचा पर्वकाळ ०१ तास १८ मिनिटांचा आहे. संपूर्ण देशात ग्रहणाचा स्पर्श, मध्य व मोक्षकाळ दिसणार असल्याचे सूर्यकांत मुळे म्हणाले.

ग्रहणारंभाच्या नऊ तास अगोदरच म्हणजे शनिवारी दुपारी ०३ : १० मिनिटांपासूनच वेध पाळावेत. ग्रहणात भोजन, जलपान करु नये; पण औषधी घेता येतील. ग्रहणात भोजन, स्नान, झोप व नैसर्गिक विधी करु नयेत. अशक्त, रोगी, गर्भवती व बालकांनी शनिवारी रात्री ०७ : ३५ वाजेपासून वेध पाळावेत. ग्रहण सुरु होताच स्नान करुन देव पाण्यात ठेवावेत. या काळात अथर्वशिर्ष्य रामरक्षा, विष्णू सहस्रनाम आदी मंत्र व स्तोत्र पठण करता येईल. या काळात दान, जप, तर्पण श्राद्धाला सुतकाचा दोष लागत नाही, असेही शास्त्रात सांगितले आहे.

मोक्ष झाल्यानंतर स्नान करावे. ग्रहण लागण्यापूर्वी घरातील खाद्यपदार्थ व पाण्यावर तुळशीपत्र ठेवल्याने त्याला ग्रहणाचा दोष लागत नाही. दरम्यान, या दिवशी कोजागरी पोर्णिमा असल्याने देवीचा कुलाचार करुन नैवेद्य दाखवावा. पण, दूध केवळ तीर्थ म्हणून पळीभरच प्यावे. ते दुसऱ्या दिवशी ठेवावे.

राशीनुसार ग्रहणाची फलप्राप्ती

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ : शुभ फलप्राप्ती.

सिंह, तुला, धनू, मीन : संमिश्र फलप्राप्ती

मेष, वृषभ, कन्या, मकर : अशुभ फलप्राप्ती

देशभर दिसणाऱ्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे शास्त्रानुसार नियम पाळावेत. ग्रहणात देखील लक्ष्मी, इंद्राची पूजा करता येईल. चार राशींच्या जातकांसाठी हे ग्रहण शुभफलदायी आहे.

सूर्यकांत मुळे

खगोलशास्त्र, पंचांग अभ्यासक व ज्योतिष विशारद, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT