Chaturmas 2023  esakal
संस्कृती

Chaturmas 2023 : चातुर्मासात भगवान विष्णू झोपल्यावर या देवी देवतांची करावी उपासना

सनातन हिंदू धर्मात चातुरमास विशेष महत्व आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Chaturmas 2023 : शास्त्रानुसार देवशयनी एकादशीपासून ४ महिने भगवान विष्णूंसह काही देवी देवताही झोपतात. हिंदू धर्मात हे ४ महिने फार महत्वपूर्ण मानले जातात. यात श्रावण, भाद्रपद, अश्वीन आणि कार्तिक या महिन्यांचा समावेश असतो.

पण यंदा चातुर्मास ४ नाही तर ५ महिन्यांचा असणार आहे. या काळात देवी-देवतांच्या उपासनेला विशेष महत्व देण्यात आले आहे. या काळात कोणत्या देवी-देवतांची उपासना करावी जाणून घ्या.

श्रावण - असं म्हणतात की, श्री विष्णू हे जागाते पालनकर्ता आहेत. जेव्हा ते झोपायला जातात तेव्हा जगाचे पालन भगवान शंकर करतात म्हणून श्रावणात शिव पूजेला विशेष महत्व आहे. याकाळात केल्या जाणाऱ्या शिव उपासनेने आयुष्यातले संकटं दूर होतात असं मानलं जातं.

अधिकमास - अधिकमास हा भगवान विष्णू पुजेला समर्पित समजला जातो. याकाळात तुळशी उपासना विशेष फलदायी ठरते.

भाद्रपद - श्रावणानंतर भाद्रपदाची सुरुवात होते. याच महिन्यात गोकुळाष्टमी येते. या महिन्यात श्रीकृष्णाची उपासना करावी. यामुळे जीवनात येत असलेल्या समस्या दूर होतात. शिवाय गणेशोत्सव पण याच महिन्यात असतो. त्यामुळे या महिने गणेश उपासनेलाही महत्व आहे.

अश्विन - या महिन्यात पितरांच्या पुजेचे आणि देवी दुर्गेच्या पुजेचे महत्व आहे. या महिन्यात १६ श्राद्ध कर्म केले जातात आणि नवरात्री सुद्धा याच महिन्यात साजरी केली जाते. असे मानले जाते की, या महिन्यात पिंडदान, तर्पण, श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला गती प्राप्त होते. तर शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची उपासना केली जाते.

कार्तिक - कार्तिक महिन्यात भगवान विष्णू देवउठनी एकादशीला ४ महिन्यांच्या चीरनिद्रेतून जागे होतात असं मानलं जातं. या महिन्यात स्नान, दानाला विशेष महत्व आहे. या महिन्यात दिवाळी, तुळशी विवाह, देव दिवाळी असे सण येतात. या महिन्यात देवी लक्ष्मी आणि विष्णू भगवानच्या उपासनेला विशेष महत्व आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT