Daily Panchang 1 may Sakal
संस्कृती

Panchang 1 May : महाराष्ट्र दिनी पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ११ शके १९४५

आज सूर्योदय ०६:११ वाजता होणार तर सुर्यास्त १८:५२ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही १५:१६ वाजता आहे तर प्रात: संध्याची वेळी ही स.०५:०३ ते स.०६:११ दरम्यान आहे. आज सायं संध्या ही  १८:५२ ते २०:०० दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४८ ते १६:२० दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५२ ते २१:०८ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार.

आज राहु काळ हा ०७:४६ ते ते ०९:२२ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १०:५७ ते १२:३२ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही एकादशी श्राद्ध असणार.

सर्व कामांसाठी स.०८:२० प.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३३ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी भात खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. (Daily Panchang 1 May 2023 ndj97)

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १५:४२ ते १७:१७

  • अमृत मुहूर्त - १७:१७ ते १८:५२

  • विजय मुहूर्त - १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास २१:०६ नं. शनि मुखात आहुती आहे. शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(२१:०६ प.नं. द्वादशी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(१६:५३ प.नं.उत्तराफाल्गुनि)

  • योग - ध्रुव(१०:५१ प.नं. व्याघात)

  • करण - वणिज(०८:२० प.नं.भद्रा)

  • चंद्र रास - सिंह (२३:२२ नं.कन्या)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

विशेष:- भद्रा ०८:२० ते २१:०६, मोहिनी एकादशी(उपवास), कृष्णामाई यात्रा(माहुली), सासवड यात्रा, महाराष्ट्र-कामगार दिन, रवियोग १६:५३ प.

या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे. शिव कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना रा.११:२२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT