Dasara Vastu Tips 2022 esakal
संस्कृती

Dasara Vastu Tips 2022 : आज घरामध्ये हा किडा दिसला तर समजून घ्या ,नशीब बदलणार आहे

आज घरात विंचू दिसला तर याला समजा शुभ संकेत

सकाळ वृत्तसेवा

विजयादशमीच्या दिवशी घरात विंचू दिसला तर घाबरू नका तर याला शुभ संकेत समजा, आर्थिक समस्या दूर होणार आहेत.नवरात्रीनंतरचा दिवस अर्थात दसऱ्याचा सण खूप खास असतो. रावण दहनासह या दिवशी विजयादशमीचा सणही साजरा केला जातो. आपल्याहून मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला जातो. वास्तुशास्त्रानुसार देखील हा सण खूप खास आणि महत्त्वाचा आहे. वास्तुशास्त्रानुसार, दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला जर घरामध्ये विंचू दिसला तर ते पाहून घाबरण्याची गरज नाही, कारण बहुदा ते लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे.

असे म्हटले जाते की दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम सुरू केले तर त्यात नक्कीच यशप्राप्ती होते. नवमी किंवा दशमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये विंचू दिसला तर तो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद म्हणावा.वास्तुशास्त्रानुसार नवमी किंवा दशमीच्या दिवशी घरात कुठेही विंचू दिसला तर ते शुभ चिन्ह आहे. सामान्यतः विंचू पाहून लोक घाबरतात, जरी त्यामागे एक चांगले कारण लपलेले असते. असे म्हटले जाते की दशमीच्या दिवशी विंचू दिसणे म्हणजे लक्ष्मी देवी लवकरच तुमच्यावर कृपादृष्टी करणार आहे आणि तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमचे आर्थिक संकट दूर होणार आहे.

दशमीच्या दिवशी घरामध्ये विंचू दिसला तर घाबरू नका किंवा इजा करू नका, तर त्याच्यासमोर हात जोडून लक्ष्मी देवीचे स्मरण करा. यानंतर, विंचवाला कोणतीही इजा न करता घराबाहेर सोडून द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT