Datta Jayanti Gurucharitra Esakal
संस्कृती

Datta Jayanti 2022: श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे?

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.

सकाळ डिजिटल टीम

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात. दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

श्रीगुरुचरित्र या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती...

Gurucharitra: श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे. 

आता बघू या सप्ताह वाचण्याची पद्धत...

● पहिल्या दिवशी  १ ते ९ अध्याय वाचावे.

● दुसऱ्या दिवशी १० ते २१ अध्याय वाचावे.

● तिसऱ्या दिवशी २२ ते २९ अध्याय वाचावे.

● चौथ्या दिवशी ३० ते ३५ अध्याय वाचावे.

● पाचव्या दिवशी ३६ ते ३८ अध्याय वाचावे.

● सहाव्या दिवशी ३९ ते ४३ अध्याय वाचावे.

● सातव्या दिवस  ४४ ते ५३ अध्याय वाचावे.

वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी २४ पूर्ण, दुसर्‍या दिवशी ३७ पूर्ण व तिसर्‍या दिवशी ५३ पूर्ण असा क्रम ठेवावा.

2) एका दिवसात समग्र श्री गुरु चरित्र वाचणारे ही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये.

3) सर्वसाधरणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करुन शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तीभावाने केव्हाही वाचाले तरी हरकत नसते. 

4) मुहूर्त, वार बघण्याची गरज नसते. मात्र पोथी वाचताना सोवळे जरुर पाळावेत.

 "अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

5) अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. 

6) सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे.

वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

7) वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.

9) दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे.

सोबत आपल्या उजव्या बाजुला एक रिक्त आसनही आंथरुन ठेवावे.

10) सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा.

11) वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.

12) वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.

13) सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)

14) सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रात:काळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी.

दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी.

15) रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.

16) सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. 

17) महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT