Diwali 2022 Esakal
संस्कृती

Diwali 2022: यंदा दिवाळीच्या पणत्या लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्यावी?

अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दिवाळी. 

आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.धनत्रयोदशीपासून या दीपावलीची सुरुवात होते. 

दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते. गणरायाला नमन केलं जातं. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

दिवाळीच्या चार दिवसांत आपण आपल्या घरात, अंगणात, रांगोळीमध्ये असे ज्याठिकाणी जमतील तिथे भरपूर दिवे लावतो आणि दिपोत्सव साजरा करतो. जेवढे अधिक दिवे किंवा पणत्या लावू तेवढा अधिक दिपोत्सवाचा आनंद मिळतो, वातावरण प्रसन्न वाटते. पण बऱ्याचदा उत्साहाच्या भरात किंवा मग गाफिल राहिल्याने हा दिपोत्सव आपल्याच अंगलट येतो आणि त्यातूनच चटका बसण्याच्या, कपडे जळण्याच्या घटना घडतात. असा प्रकार आपल्या घरी होऊ नये, आणि दिवाळी आनंदाची- उत्साहाची जावी, यासाठी दिपोत्सव  साजरा करताना या काही गोष्टींची  काळजी नक्की घ्या.

● घरात लहान मुले असतील तर शक्यतो पायऱ्यांवर, अंगणामध्ये दिवे ठेवूच नका. आपल्या जाण्या- येण्याच्या मार्गात दिवे असतील, तर त्याला कपडा लागून पेट घेण्याची जास्त शक्यता असते. 

● त्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या कृत्रिम दिव्यांचा वापर करा.अनेक जण गॅलरीमध्ये किंवा घराच्या कम्पाउंड वॉलवर दिवे ठेवतात. 

● चुकून धक्का लागून किंवा मग गडबडीत दिवा उचलताना किंवा ठेवताना तिथून तो पडण्याची शक्यता असते. अशावेळी खाली कुणी उभं असेल तर अपघात होऊ शकतो.

● रांगोळीमध्ये शक्यतो एकच मोठा दिवा लावा आणि तो ही रांगोळीच्या मधोमध. 

● कारण आजूबाजूला रांगोळी असल्याने कुणी थेट दिव्यापर्यंत जात नाही. त्यामुळे तो सुरक्षित असतो.

● ज्या दिव्यांचा किंवा पणत्यांचा बेस चांगला आहे, असेच दिवे लावा. लुंडकणाऱ्या, हलणाऱ्या पणत्या लावू नकाच.

● हँगिंग दिवे शक्यतो लावू नका. खूपच हौस असेल तर ते दिवे टांगून त्यावर बॅटरीवर चालणारे कृत्रिम दिवे ठेवून द्या.

● दिवे लावताना आपण ते सगळे एका ताटात घेतो आणि मग एकेका जागी नेऊन ठेवतो. 

● ते ताट खूप उथळ नाही ना, दिवे त्यात व्यवस्थित बसले आहेत ना, याची काळजी घ्या. 

● नाहीतर त्या जागेवर नेऊन मग दिवे पेटवा. पेटवलेले दिवे ठेवण्यासाठी प्लास्टिकचा ट्रे वापरणे टाळा.

● पुजेच्या चौरंगाच्या अगदी जवळ दिवा ठेवू नका. पूजा करताना चुकून चटका बसू शकतो.  

● यंदा दिवाळीतही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस असेल तर लाईटिंग नकोच. कारण त्यामुळे करंट बसण्याचा धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Specile Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिज्जा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

Mumbai: कामाठीपुरातील महिलांचा संकल्‍प, विधानसभेसाठी करणार १०० टक्‍के मतदान

SCROLL FOR NEXT