Bhaubeej Diwali 2022 esakal
संस्कृती

Diwali Bhaubeej 2022 : ...म्हणून साजरी केली जाते भाऊबीज; जाणून घ्या पुराणातील महत्त्व

सकाळ डिजिटल टीम

Bhaubeej 2022 : हिंदू परंपरेमध्ये सण आणि उत्सव मोठ्या श्रद्धने साजरे केले जातात. सण उत्सवांच्या संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. या पौराणिक कथा सणांचे महत्त्व आणखी वाढवतात. याचप्रमाणे भाऊबीज संबंधितही पौराणिक कथा आहेत. चला तर भाऊबीजेच्या कथा जाणून घेऊया.

यम आणि यमीची कथा

सूर्याचे पुत्र यम आणि यमी हे भाऊ आणि बहीण होते. यमुनेने आपला भाऊ यमराजाला अनेकदा घरी येण्याची विनंती केली. एके दिवशी यमराज बहिण यमुनेच्या घरी पोहोचले. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीयेचा. यावेळी यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि औक्षण करून सुखी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर यमराजांनी बहीण यमुनेला वरदान मागायला सांगितले तेव्हा यमुना म्हणाली कि, दरवर्षी या दिवशी माझ्या घरी या. या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेन ती तुला घाबरणार नाही. बहीण यमुनेचे बोलणे ऐकून यमराज अतिशय प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला. यादिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे कारण असे म्हटले जाते की भाऊबीजेच्या निमित्ताने यमुना नदीत स्नान करणाऱ्या भावा- बहिणीला पुण्य प्राप्त होते.

कथा श्रीकृष्ण आणि सुभद्रेची

एका आख्यायिकेनुसार, नरकासुराचा वध करून कार्तिक शुद्ध द्वितीयेला श्रीकृष्ण द्वारकेला परतले. या दिवशी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा यांनी अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत करत औक्षण केले. सुभद्राने श्रीकृष्णाच्या कपाळी मांगल्याचा टिळा लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. श्रीकृष्णानेही सुभद्रेला यथोचित भेट प्रदान केली होती. या दिवसापासून भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणी भावांच्या कपाळी विजयाचा मंगल टिळा लावतात आणि भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टीने 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाजगी विमानाचं ईम्मर्जन्सी लँडिंग

अखेर तारक मेहतामधील भिडेंची सोनू अडकणार लग्नबंधनात ! टप्पूशी नाही तर या क्रिएटरशी डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

३८ चेंडूंत १७८ धावांचा पाऊस! RCB चा निर्णय चूकला, संघातून रिलीज केलेल्या Mahipal Lomror चे खणखणीत त्रिशतक

Mallikarjun Kharge: खर्गेंच्या सभेचा मंडप कोसळला! त्र्यंबकेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT