diwali festival of light celebration culture Sakal
संस्कृती

Diwali Festival 2023 : रात्रीचा महिमा साजरा करणारी दिवाळी

सकाळ वृत्तसेवा

- श्री श्री रविशंकर

आपल्या प्राचीन प्रथा आणि विधींमध्ये खूप ज्ञान आणि अंतर्दृष्टी आहे, ते कोणत्या वेळी आणि कसे करावे याबद्दलदेखील वर्णिले आहे. कार्तिक महिन्यात आपण दिवाळी साजरी करतो. संपूर्ण महिनाभर लोक आपल्या घरासमोर दिवा लावतात. याचे एक कारण असे आहे, की कार्तिक हा या गोलार्धातील वर्षातील सर्वांत काळोख्या महिन्यांपैकी एक आहे, जो दक्षिणायनाचा शेवट सूचित करतो. त्यावेळी सूर्य दक्षिणेकडे जातो आणि कमी प्रकाश असतो.

दिवा लावणे हे आणखी एक प्रतीक आहे. भगवान बुद्ध म्हणाले होते, ‘अत्त दीपो भव’ म्हणजे स्वतःसाठी प्रकाश व्हा. अंधार घालवण्यासाठी एक दिवा पुरेसा नाही. ते म्हणतात, स्वत:साठी प्रकाश व्हा, आपल्या सभोवतालच्या प्रत्येकासाठी प्रकाश व्हा. त्याचा अर्थ असा आहे, की ज्ञानात राहा आणि आपल्या सभोवतालच्या लोकांपर्यंत ज्ञान आणि शहाणपण पसरवा.

दिवाळी हा सण देशाच्या अनेक भागांत काली चौदस म्हणूनही साजरा केला जातो. देवी कालीच्या पूजेला समर्पित हा उत्सव रात्रीच्या भव्यतेची सुंदर आठवण आहे. रात्र नसती, अंधार नसता, तर आपल्याला आपल्या विश्वाची विशालता कधीच कळली नसती. इतर ग्रह आहेत हे आपल्याला कधीच माहीत झाले नसते.

असे दिसते, की आपण दिवसा जास्त आणि रात्री कमी पाहतो. परंतु, आपण रात्री जे पाहतो ते ब्रह्मांड आहे, या विश्वाचे असीम वैभव. आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे डोळे मिटून घेतो, तेव्हा आपण ते खूप मोठ्या गोष्टींसाठी उघडतो.

तुम्ही लक्ष दिले आहे का, तुमच्या डोळ्यातील बाहुल्या काळ्या आहेत, त्यांना काली असेही म्हणतात. आपल्या डोळ्यात काळी बाहुली नसती तर आपण काहीही पाहू शकलो नसतो, बरोबर आहे ना?

काली हे ज्ञानाचे प्रतीक आहे. ती बुद्धीची माता आहे. ती जीभ बाहेर काढून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करणारी नाही. ते सर्व निव्वळ चित्रण आहेत. ती अशी ऊर्जा आहे जिचे वर्णन आपण आपल्या बुद्धीने करू शकत नाही किंवा समजू शकत नाही. ते फक्त अनुभवता येते.

काली भगवान शिवावर उभीदेखील आहे. याचा अर्थ काय? शिव म्हणजे मौन अनंत तत्त्व. आपण शिवाच्या गहन, मौन, अद्वैत तत्त्वाचा अनुभव घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येते, की ते आपले स्वतःचे स्वत्व आहे. तिथे आपण काली उर्जेचा अनुभव घेतो, ज्यात आपण स्वतःसाठी उच्चतम ज्ञानाचे द्वार उघडतो.

दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीचे आवाहन करतो आणि आशीर्वाद घेतो. ती तिच्यासोबत स्फुरणाची भावना घेऊन येते. पैसा मिळवण्याचा विचार अनेक लोकांमध्ये स्फुरण निर्माण करतो, तर संपत्तीच्या देवीचे दुसरे चिन्ह म्हणजे स्फुरण.

तिसरे चिन्ह सौंदर्य आणि प्रकाश आहे. तिला एकाग्र भक्ती आवडते. याचे वर्णन करणारी एक सुंदर कथा आहे. आदि शंकराचार्य जेव्हा फक्त ८ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी कनकधारा स्तोत्रम हा अतिशय लयबद्ध, शक्तिशाली आणि अर्थपूर्ण श्लोक रचला होता.

एके दिवशी आदि शंकराचार्य भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे होते. त्या घरची बाई एवढी गरीब होती, की तिच्याकडे देण्यासाठी फक्त एकच आवळा होता. तिने तो त्यांच्या भांड्यात ठेवला. तिच्या भक्तीने प्रभावित होऊन, आदि शंकराचार्यांनी लक्ष्मी देवीची स्तुती करणारे कनकधारा स्तोत्रम गायले आणि देवीने त्या घरात सोनेरी आवळ्यांचा वर्षाव केला, असे म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढविणार'; बेळगावात राजू शेट्टींची मोठी घोषणा

Atul Parchure : "तुमच्याबरोबर काम करायचं राहील" ; अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली

Baba Siddique Murder Case: कोण आहेत मोनू अन् गुल्लू? बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखी दोघांना अटक

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदेंनी आमचं पुनर्वसन केलं- हेमंत पाटील

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा

SCROLL FOR NEXT