Chanakya Niti Esakal
संस्कृती

Chanakya Niti: आयुष्यभर हे सिक्रेट कोणासोबतही करू नका शेअर, नाहीतर आयुष्य होईल उद्धवस्त

आर्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणाक्य नीती या ग्रंथामध्ये समाज आणि कुटुबात राहण्यासाठीचं योग्य आणि बारकाईने मार्गदर्शन केलं आहे

Kirti Wadkar

Chanakya Niti : आर्य चाणाक्य हे भारतातील महान विद्वानांपैकी एक. चाणाक्यांच्या मुत्सद्देगिरीमुळेच राजा चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसणं शक्य झालं. आचार्य चाणाक्यांनी Aarya Chankya अर्थशास्त्रासोबतच नीतिशास्त्राची देखील रचना केली. Do Not Share Secrets to others say Aarya Chankya Niti

आर्य चाणक्यांनी Chankya रचनलेली आचारसंहिता ही सध्याच्या काळासाठी देखील महत्वाची आहे. यामध्ये सामाजिक, व्यावसायिक. आर्थिक Financial आणि राजनैतिक धोरणांबाबतचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. 

आर्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणाक्य नीती या ग्रंथामध्ये समाज आणि कुटुबात राहण्यासाठीचं योग्य आणि बारकाईने मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या चाणाक्य नीती या पुस्तकात पैसा, आरोग्य, व्यवसाय तसचं वैवाहिक जीवन आणि जीवनातील यशाशी संबंधित अनेक गोष्टींचं तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे. Chanakya niti

आर्य चाणक्य यांचा चाणक्य नीति chankya Niti हा ग्रंथ कठीण प्रसंगात योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतो या ग्रंथात आर्यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याबद्दल माणसाने आयुष्यभर गोपनियता बाळगणं गरजेचं आहे. या गोष्टींबद्दल तुम्ही कुणाशी कधीही चर्चा करू नका. या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात.

व्यवसायामधील नुकसान सांगू नका- जर तुमचं बिझनेसमध्ये नुकसान झालं असेल तर चुकुनही या गोष्टीबद्दल इतरांना सांगू नका किंवा इतरांना या गोष्टीची कल्पनादेखील देऊ नका.

जर तुम्ही या गोष्टीबद्दल कुठे बोललात तर तुमचे विरोधक तुम्हाला कुमकुवत समजून किंवा तुमच्या नाजूक परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्हाला लक्ष्य करू शकतात. 

याशिवाय व्यवसायातील काही लोक तुम्हाला दुबळे समजून तुमच्यापासून दुरावा निर्माण करू शकतात.यामुळे आर्य चाणक्य सांगतात की व्यवसायातील नुकसानीबद्दल कुठेही वाच्यता करू नका. तसचं तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल देखील सिक्रेट राखा. Chanakya Motivational thoughts 

कौटुंबिक कलहाबद्दल राखा मौन- आर्य चाणक्य सांगतात जर तुमच्या घरात वाद किंवा मतभेद असतील तसचं पती-पत्नीच्या नात्यातही मतभेद किंवा कलह असेल तर याबद्दल कुठेही काहीही बोलू नका.

यामुळे समाजातील तुमची प्रतिमा मलीन होवू शकते. लोक तुमच्या वैवाहिक आयुष्याची थट्टा करतील परिणामी यामुळे तुमचं नातं अधिक बिघडू शकतं. 

अनेकदा कौटुंबिक वादाचा किंवा बिघडलेल्या नाते संबधांचा फायदा घेण्यासाठी समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक वाटत पाहत असतात. त्यामुळे तुमचे घरातील वाद किंवा कलह चार भिंतींच्या आतच राहू द्या. never share your secrets with anybody.

हे देखिल वाचा-

तुमच्यासोबत झालेल्या फसवणूकीबद्दल सांगू नका- आचार्य चाणाक्य सांगतात जर तुमची कुणाकडून फसवणूक झाली असले तर त्याचा कुठेही उल्लेख करू नका. यामुळे लोक तुम्हाला कुमकुवत आणि उदार समजतील. यामुळे भविष्यात तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. 

झालेल्या अपमानाचा उल्लेख करू नका- जर आयुष्यात तुमचा कुणी अपमान केला असले तर या अपमानाबद्दल इतरांना सांगू नका. कारण या गोष्टी समाजात पसरल्या तर तुमच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलू शकतो असं चाणक्य सांगतात. 

चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे या गोष्टींचा इतरांसमोर उल्लेख करणं टाळावं. कारण आपण अनेकदा इतरांना जवळचे किंवा आपले मानून आपलं दुख: सांगतो मात्र जर ती व्यक्ती तुम्हाला आपलं मानत नसेल तर तुमची समाजात केवळ थट्टा होईल. अशा गोष्टींचा फायदा घेण्यासाठी अनेक लोक संधीची वाट पाहत असतात. त्यामुळे या गोष्टींबद्दल कायम मौन बाळगावं. यामुळे तुमचं जीवन सुखकर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT