Hartalika  sakal
संस्कृती

Hartalika 2023: आज हरतालिकाचं व्रत! काय करावे आणि काय करू नये, वाचा सविस्तर

हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे.

Aishwarya Musale

 भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. यावर्षी हा सण सोमवारी १८ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे.

तरूणी आणि महिलांसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया देवी पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करतात. हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. 

हरतालिकाच्या दिवशी हे काम करा

  • हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे. हरतालिका तीजचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते.

  • या दिवशी महिला सुंदर तयार होतात आणि महादेव आणि माता पार्वतीची पूजा करतात.

  • विवाहित महिलांनी हिरव्या रंगाची साडी घालावी. कारण या दिवशी हिरव्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. हिरवा रंग शुभाचे प्रतीक मानला जातो.

  • हरतालिकाच्या दिवशी रात्री देवदेवतांची पूजा करावी आणि भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा.

हरतालिकाच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका

  • हरतालिकाच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी रागावणे टाळावे. तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तरच उपवास यशस्वी होऊ शकेल.

  • हरतालिकाच्या दिवशी पतीशी भांडण करू नका. यामुळे उपवासाचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

  • हरतालिकाच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी झोपणे टाळावे.

  • निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये.

  • हरतालिकाच्या दिवशी मांसाहार आणि मद्य सेवन टाळावे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनीही तामसिक आहार घेणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT