नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपण विजयादशमी साजरा करतो यालाच आपण दसरा सुद्धा म्हणतो. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस ओळखला जातो.
या दिवशी आपल्या आप्तस्वकीयांना आपटयांची पाने देत त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. काहींना मेसेज द्वारे शुभेच्छा पाठविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला काही हटके शुभेच्छा सांगणार आहोत ज्या तुम्ही सोशल मीडियावरुन आपल्या आप्तस्वकीयांना शेअर करू शकता. चला तर जाणून घेऊया.
1. आनंदाचा सण,
प्रेमाचा वर्षाव..
गोडाचा प्रकार,
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
2. आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
3. आंब्याची तोरणे लावूनी दारी,
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
4. दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
HAPPY DASEHRA
5. सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण, सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
6. श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
माणसातील रावणरुपी
अहंकाराचा नाश करूयात
आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात
7. दसऱ्याचा हा शुभमुहूर्त
तुमच्या व तुमच्या परिवाराच्या
आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
8. दसऱ्याच्या आनंदी प्रसंगी,
प्रभू राम तुमचे जीवन खूप आनंद,
समृद्धी आणि यशाने भरून जावो ही प्रार्थना.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
9. देवी दुर्गेच्या दैवी आशीर्वादाने तुम्ही जे काही करता त्यात यश मिळवण्यास मदत करा… विजयादशमीच्या शुभेच्छा
10. आपल्या शाश्वत 5 वाईटांवर विजय मिळवून एक उत्तम जीवन सुरू करूया
– काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार…
विजयादशमीच्या शुभेच्छा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.