वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे की, घरामध्ये वास्तुदोष असल्यास कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात. अशा घरात कितीही पैसा कमवला तरी तो टिकत नाही. आज आपण काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचे घर धन-संपत्तीने भरून जाईल. चला तर मग जाणून घेऊ असे काही उपाय..
सुरक्षिततेची दिशा
उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली जाते. या दिशेवर कुबेराचे राज्य आहे. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की, तुम्ही जिथे पैसे ठेवता ती दिशा उत्तरेकडे असावी. घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे तिजोरी अशा प्रकारे ठेवावी की कपाटाचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल, यामुळे संपत्ती वाढते, असे मानले जाते.
'या' ठिकाणी जड सामान ठेवू नका
वास्तूनुसार, प्रत्येक दिशेवर कोणत्या ना कोणत्या देवतेचे वर्चस्व असते. चुकून या दिशेला कोणतीही चुकीची वस्तू ठेवली गेली तर त्याचा परिणाम नेहमीच नकारात्मक दिसून येतो. वास्तूनुसार, उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेरची दिशा मानली जाते. अशा स्थितीत हलकी वस्तू नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. हलक्या वस्तू उत्तर दिशेला ठेवल्याने धन, सुख-समृद्धी मिळते.
भगवान कुबेरांचे चित्र
माँ लक्ष्मी ही संपत्ती, सुख आणि समृद्धीची देवी मानली जाते. दुसरीकडे, कुबेरला संपत्तीचा महत्वाचा देव मानला जातो. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला भगवान कुबेराचे चित्र लावावे. असे मानले जाते की, यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते.
मनी प्लांट
वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये मनी प्लांट खूप शुभ मानले जाते. जिथे मनी प्लांटचे रोप असते तिथे नेहमी धन, सुख आणि समृद्धी राहते, असे मानले जाते. वास्तूनुसार, मनी प्लांटचे रोप उत्तर दिशेला लावल्यास नेहमीच शुभ वार्ता ऐकायला मिळते. आणि कोणत्याही कष्टाचे चांगले फळ मिळते. जमिनीवर मनी प्लांट लावणे अधिक शुभ मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.