Family dinner vastu shastra Esakal
संस्कृती

Vasu Tips: संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवल्याने होईल धनलाभ ,जेवताना घ्या ‘ही’ काळजी

तुमच्या घरातही जेवताना खेळीमेळीचं वातावरणं नसेल, प्रत्येकजण एकट्यानं जेवणं पसंत करत असेल तर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. नाहीतर याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात

Kirti Wadkar

Family dinner vastu shastra: घरातील वयोवृद्ध जेवताना अनेक वेगवगेळ्या नियमांकडे खास लक्ष देत असतात. जेवताना काय करावं काय करू नये हे सांगत असतात. मात्र अलिकडे याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केलं जातं. पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवत Meal असे.

मात्र आता कुटुंबातील प्रत्येक सदस्य Family Members वेगवेगळ्या वेळी एकट्यानंच जेवणं पसंत करतात. Family Meal Toghert will make you rich take care of these things

मोबाईल आणि टीव्हीमुळे तर कुटुंबियांसोबत गप्पा मारत जेवणाची मजाच गेली आहे. जरी कुटुंबिय एकत्र जेवत असलं तरी तिथे संवाद नसतो तर टीव्हीची मालिका TV Serials असते.

खरं तर जेवण Meal जेवण्याची वेळ ही अशी वेळ असते जिथे कुटुंबियांसोबत Family संवाद साधला जातो त्यामुळे घरातही आनंदाचं वातावरण राहतं. Vastu tips for eating food

जेवण जेवताना या गोष्टींकडे द्या लक्ष

तुमच्या घरातही जेवताना खेळीमेळीचं वातावरणं नसेल, प्रत्येकजण एकट्यानं जेवणं पसंत करत असेल तर ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. नाहीतर याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. 

  • वास्तू शास्त्रानुसार जेवण ग्रहण करण्यापूर्वी इष्ट देवता आणि अन्नपूर्णेचं स्मरण करून तिला वंदन करणं गरजेचं आहे. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

  • तसंच जर एखाद्या व्यक्तीला पैशाची तंगी असेल तर उत्तर दिशेला तोंड करून जेवावं. 

  • तर कुटुंबातील एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तर पश्चिमेस तोंड करून जेवणं लाभदायक ठरू शकतं. 

  • जेवताना कुणाशीही जास्त बोलू नये किंवा रागवू नये.

  • वास्तू शास्त्रानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसातून किमान एकदा तरी एकत्र जेवायला बसणं गरजेचं आहे. यामुळे घरात धन-धान्य आणि सुख-समृद्धी नांदते. 

    हे देखिल वाचा-

अलिकडच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आणि कामात व्यग्र झाला आहे. त्यामुळेच एकत्र भोजन केल्याने घरातील चिंता तर मिटतीलच शिवाय कुटुंबियांसोबत काही काळ एकत्र घालवणं शक्य होईल. Eating habits you must change 

यासोबतच जेवताना अनेकांनी विविध सवयी असतात. यातील काही सवयी देखील तुमच्या घरात समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे जेवताना कसं जेवावं याबद्दलचे काही नियम जाणून घेऊयात.

  • जेवताना आपलं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. या दोन्ही दिशांना देवतांचा वास असतो. त्यामुळे असं करण्याने त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि आपल्याला जेवणातून चांगली ऊर्जा मिळते. 

  • वास्तूनुसार तुटलेल्या किंवा अस्वच्छ ताट किंवा वाटीचा जेवण्यासाठी वापर करू नये. असं केल्याने दुर्भाग्य वाढू शकतं. तसचं घरातही समस्या निर्माण होवू शकतात.

  • वास्तू शास्त्रानुसार जेवण वाढताना ताट एका हातात पकडू नये. कायम दोन्ही हातांनी ताट पकडावं. यामुळे कुटुंबात प्रेम वाढतं. 

  • जेवताना जेवणाचं ताट कधीही जमिनीवर ठेवू नये तसचं तुम्ही देखील जमीनीवर जेवायला बसू नये. कधीही आसनावर म्हणजे पाट, सतरंजी किंवा चटई काहीतर अंथरून त्यावर बसावं. तसचं ताटही पाटावर ठेवावं. 

  • वास्तू शास्त्रानुसार कधीही बिछान्यावर किंवा ताट हातात धरून जेवू नये. यामुळे नकारात्मकता वाढते. तसचं कधीही उभं राहून जेवू नये. कायम खाली बसून जेवावं तसचं जेवणाचं ताट हे कधीही बसण्याच्या जागेहून थोडं वर ठेवाव. Vastu tips for lunch and dinner 

जेवण हा आपल्या रोजच्या दिनचर्येतील अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. त्यामुळेच जेवताना वास्तू नियमांनुसार काळजी घेणं गरजेचं आहे. घरात सकारात्मक वातावरण राखण्यासाठी कुटुंबियांसोबत जेवण्याने सुख-समृद्धी येईल. 

टीप- हा लेख वास्तूशास्त्रातील गृहितकांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा कुठलाही हेतू नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT