Gatari Amavasya 2023 esakal
संस्कृती

Gatari Amavasya 2023 : आषाढ अमावस्येला गतहारी अमावस्या का म्हणतात? कशी साजरी केली जाते ही अमावस्या?

गटारी अमावस्या म्हणजे काय? ती कशी साजरी केली जाते याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ ऑनलाईन टीम

Gatari Amavasya 2023 : आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून साजरी केली जाते. यंदा २०२३ मध्ये ही अमावस्या सोमवारी येत असल्याने ही सोमवती अमावस्या म्हणूनही साजरी केली जाईल.

शिवाय आषाढ अमावस्येला दीपपूजनाची प्राचीन परंपराही आपल्याकडे आहे. त्यामुळे याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते. याला गटारी अमावस्या असेही म्हटले जाते. तेव्हा गटारी अमावस्या म्हणजे काय? ती कशी साजरी केली जाते याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

राज्यात सोमवरी म्हणजेच १७ जुलैला गटारी अमावस्या आहे. या अमावस्येचे मूळ नाव गतहारी अमावस्या असे आहे. चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. याची सुरुवात याच दिवसापासून करावी असे सांगण्यासाठीचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्या. मात्र बोलीभाषेत याला गटारी अमावस्या असे म्हटले जाऊ लागले आणि हाच शब्द पुढे प्रचलित झाला.

नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी रविवार हा दिवस हक्काचा असतो. आणि आज श्रावण सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा रविवार आहे तेव्हा बऱ्याच जणांचा आज मटणाचा बेत असतो.

गटारी शब्दाचा खरा अर्थ काय?

गटारीला गतहारी असे का म्हणतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आषाढ अमावस्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा, लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. यामागचं शास्त्रीय कारण असं की पावसाळ्याच्या चार महिन्यात मासेमारी बंद असते. तसेच शेतकऱ्यांची शेतीची कामेसुद्धा सुरु झालेली असतात. त्यामुळे हे चार महिने सोडून एरवी मुबलक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची आवक कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT