Gatari Amavasya 2024 esakal
संस्कृती

Gatari Amavasya 2024: गटारी अमावस्येला 'या' गोष्टींचे करा दान, तुमचे जीवन होईल सुखी.!

Monika Lonkar –Kumbhar

Gatari Amavasya 2024 : चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला 'गटारी' अमावस्या, 'दीप' अमावस्या म्हणून ही ओळखले जाते. यंदा ही गटारी अमावस्या ४ ऑगस्टला (रविवारी) साजरी केली जाणार आहे.

या आषाढ अमावस्येला दीपपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्या भारताला लाभली आहे. त्यामुळे, या दिवशी आवर्जून दीपपूजन केले जाते. या दिवशी अनेक जण मांसाहारावर ताव मारतात. ही गटारी अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे.

या पवित्र महिन्यात अनेक जण मांसाहार करणे टाळतात. गटारी अमावस्येला दीपपूजन करण्यासोबतच दान करण्याचे देखील विशेष असे महत्व आहे. या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपले जीवन सुखी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

आषाढ अमावस्येला दान का करावे?

आषाढ अमावस्येला दान करणे, अतिशय शुभ मानले जाते. या शुभ दिनी दान केल्याने आपल्या पूर्वजांची (पित्रांची) आपल्यावर कृपा होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे, या दिवशी दीपपूजन करण्यासोबत घरातील देवांची पूजा केल्यानंतर दान करा. शास्त्रात दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान मानले गेले आहे.

गहू आणि तांदूळ

आषाढी अमावस्येला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्वाचे मानले जाते. या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पित्रांसह, सूर्यदेवाची कृपा देखील होते, अशी मान्यता आहे. तसेच, घरात सूख-शांती समृद्धी येते, असे ही लोक मानतात.

अन्नदान

आषाढ अमावस्येला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरीबांना अन्नदान करू शकता. या दिवशी अन्नदान करणे, हे अतिशय शुभ मानले जाते. अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार, आषाढ अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा (पित्रांचा) आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते.

दूध आणि तूप

आषाढ अमावस्येला दूध, तूप, दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी आवळा, दूध, तूप आणि दही यांसह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता. या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो, अशी मान्यता आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांच्या यशवंत विचाराची प्रतारणा करणाऱ्या गद्दारांना मतदारांनी धडा शिकवावा'; अमोल कोल्हेंची सडकून टीका

Nashik News : दसऱ्यानिमित्त वाहन बाजारात 50 कोटींचे सीमोल्लंघन! येवल्यात दीडशेवर ट्रॅक्टर, तर शंभरावर चारचाकींची विक्री

Haryana election results: ''अशी मागणी केली तर दंड केला जाईल'', हरियानातील निकालावरुन कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले

Diwali Special Stocks: कमाईची सुवर्णसंधी! दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करणार? पहा टॉप 10 शेअर्सची यादी

Malad Murder: मालाड मारहाणीत मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकार्‍याच्या कुटुंबाची राज ठाकरेंनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT