Good Omens esakal
संस्कृती

Good Omens : ऑफिसला जाताना नजरेसमोर 'या' गोष्टी येणं, म्हणजे...

ऑफिसची काही काळापासून अडकलेली कामं पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे असे संकेत या गोष्टी तुम्हाला देतात, असं तज्ज्ञ मानतात.

सकाळ डिजिटल टीम

Morning Time Auspicious Incidents : ऑफीसचा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे खास हे सांगणारे काही संकेत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते या गोष्टी घडल्या की नशीब पालटतं. ऑफिसची काही काळापासून अडकलेली कामं पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे असे संकेत या गोष्टी तुम्हाला देतात, असं तज्ज्ञ मानतात.

सफाई कामगार

ऑफिसला जाताना सफाई कामगारांना रस्ता झाडताना पाहणे खूप शुभ मानले जाते. खरं तर झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून याला शगुन मानले जाते. एखाद्याला झाडू मारताना पाहणे म्हणजे तुमच्या यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होत आहेत आणि तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. आपला प्रकल्प यशस्वी करण्याची हीच वेळ आहे असा संकेत ही गोष्ट तुम्हाला देते.

नवविवाहिता

सकाळी जर तुम्हाला एखादी नवविवाहित स्त्री सजलेली दिसली किंवा गाडीतून निघताना दिसली, तर हे देखील एक चांगले लक्षण आहे. असे मानले जाते की सर्व समस्यांपासून मुक्त होऊन, तुम्ही पुढे जाल आणि तुमच्या करिअरमध्ये यश मिळवाल. पूर्ण सजलेली स्त्री ही लक्ष्मीचे रूप मानली जाते. सकाळी अशा स्त्रीला पाहणे म्हणजे नशीब तुमच्यावर मेहरबान आहे आणि तुम्हाला लवकरच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल असा संकेत मिळतो.

साधूसंतांचा समूह

घरातून ऑफिसला जाताना संतांचा समूह किंवा भक्तांचा समूह यात्रेला जाताना दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. असे झाल्यावर मनातल्या मनात भगवंताचे ध्यान करा आणि ऋषी-मुनींना नमस्कार करून पुढे जा.

रस्त्याने जाताना मृतदेह पाहायला मिळणे

काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना मृतदेह पाहणेही खूप शुभ मानले जाते. मृतदेह वाहून जाताना पाहणे चांगले मानले जाते आणि तुम्हाला मिळणारे यश सूचित करते. मृतदेह कोणत्याही दिशेला दिसणे शुभ मानले जात असले तरी पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशेला जाताना दिसल्यास ते अधिक चांगले असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024: भाजप अन् एकनाथ शिंदेंचा विरोध तरी अजित पवारांनी मलिकांना का बनवले 'नवाब'?

Viral Video: एक मिनिट उशीर झाला अन् माजी मंत्र्याचं विधानसभेचं मैदान हुकलं! अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय घडलं?

IND vs NZ 3rd Test : मुंबईतही असणार संघ निवडीचा पेच? हर्षित राणाची निवड, बुमराला विश्रांती की, तीन वेगवान गोलंदाजासह खेळणार

Diabetic Friendly Diwali Sweets : यंदा दिवाळीत मधुमेहींनी गोडधोड पदार्थांचा घ्या पुरेपूर आनंद,या आहेत खास रेसिपी

Ayodhya Deepotsav 2024 : २५ लाख दिव्याने उजळणार अयोध्या! श्री राम जन्मभूमीत होणार विश्वविक्रम; 'हे' असेल मुख्य आकर्षण

SCROLL FOR NEXT