Guru purnima 2022
Guru purnima 2022  Sakal
संस्कृती

Guru purnima 2022 : गुरु पौर्णिमेसाठी खास मराठी संदेश

सकाळ डिजिटल टीम

Guru purnima 2022 : तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभत असतं. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात फार पुरातन काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात. या खास दिवशी तुमच्या गुरुंना तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय गुरु पौर्णिमा खास मराठी संदेश ( guru purnima quotes in marathi)

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

आदी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे ||1||

गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप || 2||

गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे तया पाशी ||3||

तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे हृदयीं धरू ||4||

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता

खोटे काय, खरे काय ते आपण समजावता

जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज गुरुपौर्णिमा माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,

सर्वांचे आभार,

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा..!

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज गुरुपौर्णिमा, ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया..!

जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुरुविण कोण दाखविल

वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,

अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करुन सोडी, सकळं जना,

तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाआई माझी गुरु, आई माझी कल्पतरु, माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,

लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,

गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

आधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,

गुरु म्हणजे माय बापं ,नाम घेता हरतील पापं,

गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छाआई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला, ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,

अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भयानक अपघात! 70 प्रवासी असलेली बस कोसळली, दोन मुलांचा मृत्यू

Jagannath Rath Yatra 2024: पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

MS Dhoni Birthday: 'भाईजान'सोबतच्या वाढदिवशी धोनीला CSK च्या कर्णधाराचा आला व्हिडिओ कॉल, Photo व्हायरल

Mahua Moitra FIR: बेताल वक्तव्य भोवलं! महुआ मोईत्रांविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

महिलेला वाचवण्यासाठी ११ ते १२ वर्षांच्या मुलींनी तलावात घेतल्या उड्या, महिला वाचली पण ४ मुलींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT