Guru Purnima 2024 Sakal
संस्कृती

Guru Purnima 2024: अशी करा यंदाची गुरुपौर्णिमा साजरी, जाणून घ्या संपुर्ण विधी

सकाळ वृत्तसेवा

Guru Purnima 2024: हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

गुरूंच्या कृपेमुळे जीवनात सुख, शांती, आणि समृद्धी येते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे जीवनात यश आणि प्रगती होते.

यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे?

यावर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४, रविवारी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेचा शुभारंभ शनिवारी (ता. २०) संध्याकाळी ५:५९ वाजता होईल आणि रविवारी (ता. २१) दुपारी ३:४६ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, रविवारी गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जाईल.

गुरुपौर्णिमेचा पूजा विधी

पहाटे लवकर उठून स्नान करावे.

स्वच्छ आणि नवीन कपडे परिधान करावेत.

देवाचे नामस्मरण करून दिवसाची सुरवात करावी.

सूर्यदेवतेला अर्घ्यदान करावे.

पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णू आणि वेदव्यास यांच्या मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी.

मूर्ती किंवा फोटोवर फुले, धूप, दीप, अक्षता अर्पण करावीत.

तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि गुरूकवचाचे पठण करावे.

देवाला फळे, मिठाई, खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

बुद्धिमत्ता किंवा ज्ञानासाठी उपयुक्त पुस्तकाची पूजा करू शकता.

गरिबांना अन्न, दक्षिणा, कपडे किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Protest : आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजपचे आंदोलन

धक्कादायक! वड्यात मीठ जास्त असल्याची तक्रार; 'जोशी वडेवाले' हॉटेलमध्ये महिलेसह चिमुकल्यांसोबत मारहाणीची घटना

Pune News : विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आक्रमक वळण ‘सारथी’च्या इमारतीचे काम बंद

जर Joe Root ने सचिनचा विक्रम मोडला, तर असा काय फरक पडणारे? गावसकरांचा माजी कर्णधाराला थेट सवाल

Arvind Kejriwal यांची तिहार तुरुंगातून सुटका, जेलमधून बाहेर येताच म्हणाले- देशाचे विभाजन करून...

SCROLL FOR NEXT