गुरुपौर्णिमा विशेष Esakal
संस्कृती

Guru Purnima 2023- गुरुपौर्णिमेचा ऋषी व्यास आणि गौतम बुद्धांशी काय आहे संबध? जाणून घ्या सविस्तर

आपण अनेकांनी आजवर अशा आदर्श गुरु शिष्याच्या जोडीच्या कथा ऐकल्याही असतील. गुरु पौर्णिमेला Guru Pournimaआपल्याला जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य ज्ञान Knowledge देणाऱ्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते

Kirti Wadkar

गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम....  ग.दी माडगुळकरांच्या या ओळी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. हिंदू धर्मामध्ये Hindu Religionगरु पौर्णिमेला महत्वाचं स्नान आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरू पौर्णिमेला Guru Pournima विशेष स्नान आहे. पुराणांपासून गुरु शिष्याच्या नात्याच्या अनेक कथांचा उल्लेख आढळतो. Hindu Religion know the importance of Guru Pournima

आपण अनेकांनी आजवर अशा आदर्श गुरु शिष्याच्या जोडीच्या कथा ऐकल्याही असतील. गुरु पौर्णिमेला Guru Pournimaआपल्याला जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य ज्ञान Knowledge देणाऱ्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. 

दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजर केली जाते. या पौर्णिमेला वेद पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा देखील म्हंटलं जातं.  या दिवशी आपल्याला जीवन जगण्याचं ज्ञान देणाऱ्या, प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरुंचे Teacher Guru आभार मानले जातात आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. यंदाच्या वर्षी गुरु पौर्णिमा नेमकी कधी आहे हे पाहुयात. 

गुरू पौर्णिमा तिथी आणि पूजा मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा २ जुलै रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी सुरु होत असून ३ जुलै सोमवारी ५ वाजून ८ मिनिटांनी समाप्त होते. उदयतिथीनुसार ३ जुलैला गुरु पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. 

गुरु पौर्णिमेला गुरुंची पूजा आणि इतर पुजाविधी तसंच दानधर्म आणि शुभ कार्य करण्यासाठी सकाळी ५.२७ पासून ७.१२ आणि सकाळी ८.५६ पासून १०.४१ हे शुभ मुहूर्त आहेत. तसंच दुपारच्या वेळी २.१० ते ३.५४ हा शुभ मुहूर्त आहे.

यंदाच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी इतरही शुभ योग जुळून आले आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मयोग, इंद्र योग आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहेत.

हे देखिल वाचा-

गुरु पौर्णिमेला वेद व्यास जयंती म्हटलं जातं

पुराणातील कथेनुसार महर्षि वेद व्यास यांचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. यामुळेच या पौर्णिमेला वेदव्यास जयंती असंही म्हटलं जातं. महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली होती. गुरु पौर्णिमेच्या दिवशी वेद व्यास यांची देखील म्हणूनच पूजा केली जाते.

गुरु पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हंटलं जातं?

गुरु पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे अनुयायी बुद्ध पौर्णिमा देखील साजरी करतात. यामागे खास कारण आहे. राजकुमार असलेल्या सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांनी २९व्या वर्षी जीवनाचं सत्य शोधण्यासाठी घर सोडलं. ६ वर्ष बोधीवृक्षाखाली बसून त्यांनी तप केलं. 

हे देखिल वाचा-

ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्ध पायी चालत सारनाथला गेले इथे त्यांनी पहिल्यांदा आपल्या शिष्यांना प्रवचन दिलं. म्हणूनच या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये गुरु पौर्णिमेचा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. 

गुरु पौर्णिमेच्या दिवशी विविध मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये साधु संतांची आणि गुरुंची पूजा केली जाते आणि गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT