Mahadev bhakti Esakal
संस्कृती

Shravan 2023 : श्रावणात शिवरुद्राष्टकम पाठ करून महादेवाला करा प्रसन्न, सर्व इच्छा होतील पूर्ण

Mahadev bhakti: श्रावणामध्ये श्रावणी सोमवारच्या व्रतांसोबतच रुद्राभिषेक तसचं श्री शिव अष्टोत्तरशत आणि शिव रुद्राष्टकम पाठ करणं शुभ मानलं जातं

Kirti Wadkar

Mahadev bhakti: श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो. श्रावणमासामध्ये अनेत पूजा-विधी आणि व्रत केले जातात. खास करून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात खास व्रत वैकल्यं केली जातात.

श्रावण महिना हा महादेवाला प्रिय असल्याने हा महिना महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. Hindu Religion know the importance of Shivrudrashtkam in Shravan

म्हणूनच श्रावणामध्ये महादेवाची पूजा Mahadev Pooja आणि व्रत केल्यास ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होवून त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. महादेवाचे भक्त श्रावणामध्ये Shravan विविध व्रत आणि पूजा-विधी करून महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

अगदी महिलांपासून पुरुष आणि कुमारिकांपासून विवाहित महिला महादेवाचं व्रत करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारच्या व्रतांसोबतच रुद्राभिषेक तसचं श्री शिव अष्टोत्तरशत आणि शिव रुद्राष्टकम पाठ करणं शुभ मानलं जातं.

शिव रुद्राष्टकम

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना ती विधीवत केल्यास त्याचं फळ नक्कीच चांगंल मिळेल. यासाठीच या शुद्धमासामध्ये महादेवाचा जलाभिषेक तसचं रुद्राष्टकम पाठ करणं गरजेचं आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी शिव रुद्राष्टकम पाठाची रचना केली असल्याचं म्हंटलं जातं. असं म्हंटलं जातं की शिवरुद्राष्टकम पाठ केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.

या स्तोत्रामुळं महादेवाची आपल्या भक्तांवर कायम कृपादृष्टी राहते. शिवरुद्राष्टकम पाठ केल्याने सर्व संकट दूर होऊन सुख शांती लाभते. तसचं रोग, भय आणि पिडा दूर होते. तसंच शत्रूंचा विनाश होतो. हा पाठ केल्याने महादेव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात.

हे देखिल वाचा-

शिवरुद्राष्टकम पाठ विधी

शिवरुद्राष्टकम पठन हे दररोज केल्याने महादेवाची कृपा कायम राहते. मात्र जर तुम्हाला रोज हे शिव पठण शक्य नसेल तर तुम्ही श्रावणात शिवरुद्राष्टकम पठण नक्की करू शकता. श्रावणमासात सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र, दूध, दही, गंगाजल आणि फूल अर्पण करून महादेवाची पूजा करावी.

तुम्ही एखाद्या शिव मंदिरात किंवा घरातच सलग ७ दिवस सकाळ आणि संध्याकाळ रुद्राष्टकम स्तुती पठण करू शकता. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतील.

रावणावर विजय मिळवण्यासाठी रामाने केलं होतं रुद्राष्टकम पठण

पौराणिक कथेनुसार श्रीरामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी रामेश्वर इथं शिवलिंगाची स्थापना करून मोठ्या श्रद्धेने रुद्राष्टकम स्तुती पठण केलं होतं. यामुळेच भगवान शंकराच्या आशिर्वादाने श्रीरामांना रावणाचा अंत करणं शक्य झालं.

शिव रुद्राष्टकम स्तुती

शिव रुद्राष्टकम पाठ

नमामीशमीशान निर्वाणरूपं

विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्

निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं

चिदाकाशमाकाशवासं भजेहम्

निराकारमोङ्करमूलं तुरीयं

गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् ।

करालं महाकालकालं कृपालं

गुणागारसंसारपारं नतोहम्

तुषाराद्रिसंकाशगौरं गभिरं

मनोभूतकोटिप्रभाश्री शरीरम् ।

स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा

लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा

चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं

प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।

मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं

प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि

प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं

अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशं ।

त्र्यःशूलनिर्मूलनं शूलपाणिं

भजेहं भवानीपतिं भावगम्यम्

कलातीतकल्याण कल्पान्तकारी

सदा सज्जनानन्ददाता पुरारी ।

चिदानन्दसंदोह मोहापहारी

प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी

न यावद् उमानाथपादारविन्दं

भजन्तीह लोके परे वा नराणाम् ।

न तावत्सुखं शान्ति सन्तापनाशं

प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं

न जानामि योगं जपं नैव पूजां

नतोहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् ।

जराजन्मदुःखौघ तातप्यमानं

प्रभो पाहि आपन्नमामीश शंभो

रूद्राष्टकं इदं प्रोक्तं विप्रेण हर्षोतये

ये पठन्ति नरा भक्तयां तेषां शंभो प्रसीदति।।

॥ इति श्रीगोस्वामितुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णम्॥

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT