Bhulabai Esakal
संस्कृती

Bhulabai: भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा इतिहास

भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.

दिपाली सुसर

विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा केला जातो. विदर्भासह हा भुलाबाईचा सण मराठवाडय़ाच्या विदर्भालगतच्या काही जिल्ह्य़ांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ातपण साजरा होतो. मात्र भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही विदर्भात फार जास्त पाहायला मिळते. विदर्भातल्या ग्रामीण भागात कोजागरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये दणक्यात साजरी केली जाते. माळी पौर्णिमेचा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून लहान मुली व महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात.

भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून हा सण सुरू होतो. म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. एक महिन्याकरिता ती आपल्या माहेरी येते. तिचा हा सण, भुलाबाईसोबत भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात. माहेरवाशीण भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब असलेला शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. शेतकरी घरांमध्ये भुलाबाईचा हा उत्सव सखी पार्वतीचा उत्सव म्हणूनही लहान मुलींमध्ये ओळखला जातो. भुलाबाईचा हा उत्सव वैदर्भीय लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा अभ्यंग ठेवा आहे. भुलाबाईचा हा उत्सव विदर्भात पारंपरिक बालमहोत्सव म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे.

भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.

भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।

पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।

गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।

सर्व मुली गोळा झाल्या । टिपर्‍या मध्ये गुंग झाल्या ।

प्रसाद घेऊन घरी गेल्या ।

या गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते.

भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.गणपतीच्या आगमनानंतर भुलजा-भुलाबाई येतात. 16 वर्षाखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. हयामध्ये शिव-शक्तीच्या पुजेकरिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृशी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते.

भुलाबाई हा सृजनाचा विधी असतो. भुलजा-भुलाबाईला पाटावर बसवतात व ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर त्यांच्या भौवती ठेवतात. त्यांना पिवळे वस्त्र चढवितात. हा कुळाचार आहे. शेजारी अन्नाच्या ढिगार्‍यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे.विदर्भातील हा लोककथा-गीत कला प्रकार फार मजेशीर आहे. या उत्सवा मध्ये ज्यांच्या घरी भूलाबाई बसतात त्यांच्या घरी शेजारच्या मुली गोळा होतात. आणि भुलाबाई समोर बसून मजेशीर गाणी म्हणतात. व ती खूपच दूतगतीने म्हटली जातात.कधी-कधी भुलाबाई आपल्या सासरच्या मंडळींना तिला माहेरी जायचे आहे त्यासाठी विनवणी करते. जसे-

सासुबाई-सासुबाई मला मूळ आलं

जाऊ द्या मला माहेरा-माहेरा

कारल्याची बी पेर गं सुनबाई

मग जा आपल्या माहेरा-माहेरा

कारल्याची बी पेरली हो सासुबाई

आता तरी जाऊदया माहेरा-

माहेराभुलाबाईच्या गरीब स्वभावाचा सासू कसा फायदा उचलते हयाचे उदाहरण या गीतातून दिसते. तर हया सगळया त्रासाला कंटाळून जेव्हा भुलाबाई रूसून बसते तर सासरची मंडळी तिला कसे मनवतात ते ही यापुढील गीतातून आपल्याला दिसते.

यादवराया राणी रूसून बैसली कैसी

सासुरवास सोसून घरात येईना कैसी

सासु गेली समजावयाला चला चला

सुनबाई आपल्या घराला

पाटल्यांचा जोड देते तुम्हाला

पाटल्यांचा जोड देते तुम्हाला

पाटल्यांचा जोड नको मला

मी नाही यायची तुम्हच्या घराला

या गीतात सासरची मंडळी तिला अनेक प्रकारचे अमिष दाखवून घरी घेऊन जायला आले आहेत. पण ती कोणाच्या विनंतीला मान देत नाही, परंतु शेवटी जेव्हा नवरा समजावतो तेव्हा ती लगेच तयार होते. कारण जेव्हा तिला माहेरी यायच होत. तेव्हा तिला नवराच घेऊन आला होता. आणि दुसरे असे दिसून येते की भुलाबाईला दागिन्यांची ओढ नाही तर प्रेमाची ओढ आहे. नवर्‍याच्या प्रेमासाठी ती सासरवास सहन करायला तयार आहे. भुलाबाई ही सामान्य मुलींच किंवा सासुरवासी मुलींच एक प्रतिक रूप आहे. भुलाबाई त-कथा कला प्रकार हा मुलींना सासरी कस वागवावं याची शिकवण देते कारण सासर म्हणजे फक्त एक कुटूंब नाही तर समाज आहे आणि भुलाबाईच्या स्वरूपातील प्रत्येक मुलगी दोन कुटूंबांना एकत्र करून भावी आदर्श समाजाचे सृजन करणारा एक दुवा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT