Holika Dahan Katha esakal
संस्कृती

Holi 2023 : भक्त तर प्रल्हाद होता, मग आपण राक्षसी होलिकाची पूजा का करतो?

कधी प्रश्न नाही पडत की होलिका ही एक राक्षसी होती तरीही आपण तिची पूजा का करतो? याची कथा...

सकाळ डिजिटल टीम

Holika Dahan Katha : दरवर्षी आपण होळी साजरी करतो, याही वर्षी ०६ मार्चला होळी साजरी होणार आहे, होळी साजरी करण्याच्या दिवशी आपण नेहमी होलिका दहन करुन तिची पूजा करतो पण कधी प्रश्न नाही पडत की होलिका ही एक राक्षसी होती तरीही आपण तिची पूजा का करतो? याची कथा तुम्हाला माहिती आहे का? चला बघूया कहाणी...

हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करुन त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वत:ला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता.

पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र भगवान विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला.

सगळे उपाय करुन थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली "दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्नी देवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जाळून खाक होईल.

हे ऐकून हिरण्यकश्यपने गवत आणि वाळलेल्या लाकडाची मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली आणि शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंधीत होती. पण, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले.

होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.

तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. सूर्यास्ताला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT