Vastu Tips for Negative Energy esakal
संस्कृती

Vastu Tips for Negative Energy : तुमच्या 'या' अगदी निव्वळ चुका अन् घरात येते नकारात्मक ऊर्जा

मोठे बदल करणे अशक्य असेल तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करुनही घरातली नकारात्मक ऊर्जा संपवू शकतात

Lina Joshi

Vastu tips to remove negative energy: घरात एकदा नकरात्मक ऊर्जा आली की ती घर अगदी वाळवीसारखं पोखरुन काढते परिणामी घरात वाद, कटकटी होऊ लागतात, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य धोक्यात येते, अचानक लोकांची तोंड चार दिशांना होऊ लागतात आणि गृहकलह वाढतो.

कोणत्याही परिस्थितीत घरात नकारात्मक ऊर्जा घरात येयला नको किंवा आपल्याकडून अशी कोणतीच गोष्ट व्हायला नको ज्यामुळे घरात नकारात्मकता येईल, आज आपण जाणून घेऊया की घरात नकारात्मक ऊर्जा नक्की कुठून येते? आणि तिला थांबवण्यासाठी काय करावं लागेल.

नकारात्मक ऊर्जा कुठून येते?

अजूनही जर तुमचा गैरसमज असेल की घरातली नकारात्मक ऊर्जा ही दिशेवर अवलंबून नसते किंवा वास्तुदोषाने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही चुकीचे आहात. घरातली प्रत्येक गोष्ट त्या त्या ठिकाणीच असली पाहिजे, जसे की

१. पाणी हे नेहमी नैऋत्य दिशेलाच हवे.

२. अग्नेय दिशा ही अग्निचे प्रतिनिधित्व करत असते अशात इतर ठिकाणी आपला गॅस नसावा.

३. ईशान्य दिशेला देवघर असावं, ही घरातली सर्वात पवित्र जागा समजली जाते.

४. कचरा ठेवतांना तो चुकूनही ईशान्य कोपऱ्यात ठेऊ नका.

५. घरातल्या मुख्य पुरुषाने नेहमी नैऋत्य कोपऱ्यात झोपावं.

कुठेही कोणतीही वस्तू ठेवल्याने जीवनातला उत्साह संपतो, जीवावर संकट बेतू शकतं, विविध प्रकारच्या भीती मनात घर करते, परिवारातला आनंद नष्ट होतो आणि चेहरा निस्तेज होतो. तुमच्या घरात असे वास्तुदोष असतील तर वास्तूशास्त्रज्ञांचा सल्ला घेत ते बदल करा त्याने नकारात्मकता निघून जाईल.

नकारात्मकता कशी घालवावी?

आपल्या घरातले वास्तुदोष संपवण्यासाठी आपण आपल्या घरात काही बदल करु शकतात, अर्थात भाड्याच घर असेल किंवा असे मोठे बदल करणे अशक्य असेल तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करुनही घरातली नकारात्मक ऊर्जा संपवू शकतात.

१. बाहेरुन आल्या आल्या हातपाय धुवा.

२. दारापुढे रांगोळी काढा.

३. वायव्य दिशेचे वास्तू दोष दूर करण्यासाठी हनुमानजींचा फोटो या दिशेला लावा. 

४. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र लावणे अनेक वास्तू दोषांवर उपाय आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

५. पार्वती देवीचा एक अवतार कालरात्री देवीला शरण जा आणि 'जय त्वम् देवी चामुंडे, जय भूतार्ति हरिणी। जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तु ते ॥' या मंत्राचे नामस्मरण करा.

६. रोज संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर कापूर लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT