indapur wari ringan warkari ashadi wari 2023 vitthal rukmini sant tukaram maharaj sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं; इंदापुरातील रिंगण सोहळा दोन तास रंगला

रणरणत्या उन्हाच्या ३२ अंश सेल्सिअस तापमान असतानाही सलग दोन तास रिंगण रंगले

राजेंद्रकृष्ण कापसे

इंदापूर : आसमंतात फडकणाऱ्या पताका… टाळ मृदुंगाचा गजर... श्रीविठूरायांचा जयघोष सुरू होता. अशा भक्ती कल्लोळात पेठ बाभूळकरांचा मानाचा देवाचा अश्व व स्वाराचा मोहिते पाटील यांच्या अश्वाने वायूवेगाने दौड करीत पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अक्षरश: घामाच्या धारा वाहताना वारकरी उडीच्या खेळात रमले होते. रणरणत्या उन्हाच्या ३२ अंश सेल्सिअस तापमान असतानाही सलग दोन तास रिंगण रंगले होते.

संत तुकाराम महाराज पालखीतील दुसरे गोल रिंगण गुरुवारी इंदापुरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर पार पडले. दीड वाजता पालखी आयटीआयच्या मैदानावर विसावली.

लागोनियां पाया विनवितो तुम्हांला ।

कर टाळीं बोला मुखें नाम ॥१॥

विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।

हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥२॥

असे संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. निमगाव केतकीतून गुरुवारी सकाळी सोहळा मार्गस्थ झाला. काकड आरतीचे अभंग म्हणत तरंगवाडी कॅनॉल व गोकुळीचा ओढा मार्गे पावणे अकरा वाजता इंदापुरात पोचला. त्यामागे, २७ दिंड्या व रथ पोचला. रथामागील काहीच दिंड्या रिंगणात आल्या होत्या. रथ प्रदक्षिणा घालून पावणे बारा वाजता पालखी रथातून रिंगणाच्या मध्यभागी ठेवली.

सुरुवातीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आशिष शेलार, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांनी दर्शन घेऊन रथाचे सारथ्य केले. त्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही दर्शन घेऊन सारथ्य केले.

अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज देहुकर, सोहळाप्रमुख संजय मोरे, अजित मोरे, विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नितीन मोरे, बापूसाहेब मोरे, बाळासाहेब मोरे, प्रल्हाद मोरे, रामभाऊ मोरे, विश्वजित मोरे, मधुकर मोरे, सुरेश मोरे उपस्थित होते. देहुकरांच्या सूचनेनुसार चोपदार नामदेव गिराम, देशमुख चोपदार, कानसूरकर चोपदार यांनी रिंगण लावले.

पताकाधारी तुळस हांडेकरी महिला, सेवेकरी म्हणजे पोलिस, शासकीय अधिकारी- कर्मचारी होमगार्ड यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व खासदार धनंजय महाडीक रिंगणात धावले. विणेकऱ्यांचे १२ वाजता रिंगण पार पडले. दोन्ही अश्वाने वायूवेगाने दौड करीत पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दुपारी पावणे दोन वाजता ‘आयटीआय’च्या मैदानावर सोहळा विसावला. गुरुवारी मालकांच्या वतीने कीर्तन तर हटकळे दिंडी यांच्यावतीने जागर झाला.

...त्यांच्या गळ्यात टाळ घातले

अश्वाचे रिंगणानंतर ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष सुरू झाला. दोन्ही अश्व पालखीजवळ नतमस्तक होताच त्यांना मान दिला. पालखीसमोर राजकीय पदाधिकारी, त्यांचे अंगरक्षक, सरकारी अधिकारी- कर्मचारी उभे होते. उडीचा खेळ सुरू होत नसल्याने हभप पुंडलिक महाराज मोरे देहुकर यांनी पालखी समोरील अनावश्यक गर्दी कमी करा. अन्यथा उडीचा खेळ न करता पालखी उचलण्यात येईल. असा इशारा दिला. मग सरकारी अधिकारी- कर्मचारी व स्थानिक भाविक बाजूला गेले. राजकीय व्यक्ति चौथऱ्यावरून खाली आले. हभप पुंडलिक महाराज मोरे देहुकर यांनी त्यांच्या गळ्यात टाळ घातले. मग पखवाज वादक, टाळकऱ्यांना जागा मिळाली. मग उडीचा खेळ सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT