Indian Temples esakal
संस्कृती

Indian Temples : 'देऊळ पंचमहाभूतांचे' वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे भारतीय हिंदू देऊळ

भारतीय हिंदू ‘देऊळ’ म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना

सकाळ डिजिटल टीम

Indian Temples : भारतीय हिंदू ‘देऊळ’ म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना.  याचे कारण त्याचे उत्कृष्ट बांधकाम व सुंदर मांडणी आहेच; पण त्याही पलीकडे या देवळांमध्ये असलेला प्राण आणि ऊर्जा. हा प्राण देवळांना आध्यात्मिकदृष्ट्या एका उंच पातळीवर नेतो.

देवळांचा भारतीय समाजाशी खूप जवळचा संबंध होता आणि आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या देवळातील देवाचे वास्तव्य, तेथील प्राण, ऊर्जा आणि जिवंतपणा. पृथ्वी, जल, आप, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतांची तत्त्वे. या पाच तत्त्वांनी संपूर्ण सृष्टी बनली. गीतेतील सातव्या अध्यायातील चौथा श्लोक. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या प्रकृतीच्या आठ शक्ती मानल्या आहेत. पंचमहाभूतांबरोबर मानवाच्या मन, बुद्धी आणि अहंकार या गुणांना तेवढेच महत्त्व आहे.

मानवाचा ‘प्रकृती’ (environment) मधील सहभाग अथवा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे, हेच या श्लोकातून व्यक्त होते.  मानवाचे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहेच; पण त्याच्या जोडीला जर माणसाचे मन, त्याची बुद्धी आणि अहंकार समजून घेतला तरच पंचमहाभूतांचा समतोल साधता येईल. माणसाने उभारलेली वास्तू, मग ते त्याचे राहते घर असो अथवा देऊळ, पंचमहाभूतांसोबत माणसाचे मन, बुद्धी आणि अहंकाराच्या सहयोगाने बनलेले असतात. वास्तुशास्त्राचे बीज येथेच रोवले आहे.

Indian Temples

आगम शास्त्रात देऊळ बांधायचे आणि देऊळ रचनेचे सखोल तंत्र उपलब्ध आहे आणि त्यालाच वास्तुशास्त्र म्हणतात. तंत्र म्हणजे इंग्रजी भाषेतील technique.  मानवाच्या शरीराशी देवळाच्या रचनेचा जवळचा संबंध या वास्तुशास्त्रामधून दिसतो. मार्ग कुठलाही असो निर्गुणाचा अथवा सगुणभक्तीचा. मानवाची मानसिकता आणि त्याचा मनोभाव देऊळ रचनेत गुंफल्याने मानवाच्या आत्मविकासाचा मार्ग देवळामुळे सुकर आणि सहज होतो, असे वास्तुशास्त्राच्या मूळ तत्त्वात आहे.

प्राचीन ऋषींनी मंदिरांना मानवी देवाचे निवासस्थान मानले होते; मात्र मंदिर अगदी मानवी शरीराप्रमाणे मानवाच्या एक एक अवयवयाप्रमाणे घडवण्यासाठी वास्तुकारांना खूपच विचार करावा लागला आणि वेळही द्यावा लागला. अग्निपुराण हयशीर्षपंचरात्र, शिल्परत्न इत्यादीमध्ये मंदिराच्या वेगवेगळ्या भागांचे वर्णन त्यांना जुळणाऱ्या मानवी अवयवांच्या नावानुसारच केले आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कलश म्हणजे केस, आमलक म्हणजे मस्तक, कंठ म्हणजे गळा, शुकनास  म्हणजे नासिका, वेदी म्हणजे स्कंध, भद्र म्हणजे दंड, प्रवेशद्वार म्हणजे मुख,  द्वारं म्हणजे ओष्टद्वय, जंगा म्हणजे मांड्या आणि प्रतिमा म्हणजे साक्षात प्राणच.  (अग्निपुराण ६१,  २३-२५) या सर्व घटकांचे मिळून जे मंदिर बनते त्याला समारंगणसूत्रधारानुसार प्रासाद आणि ईशान शिवगुरू देवपद्धतीनुसार विमान म्हणतात. (Hindu Religion)

देवळाचा अभ्यास करताना देवळाच्या शरीराचा म्हणजे बांधकामाचा, शिल्पांचा, बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विविध साधनांचा, तंत्रांचा फक्त अभ्यास करून भागणार नाही तर तेथील प्रत्येक जागेला कान्याकोपऱ्याला महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या जिवंतपणाला समजून घेण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या अनुसंधानाची गरज आहे.  

 यत् पिंडी तत् ब्रह्मांडी अन् यत् ब्रह्मांडी तत् पिंडी

अर्थात मानवी शरीर आणि ब्रह्मांड एकाच तत्त्वाने बांधले आहे. ज्या पंचमहाभूतांनी हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापले त्याचाच अंश म्हणजे मानवाचे शरीर. या भूतलावरील प्रत्येक वस्तू आणि वास्तू हे या पंचमहाभूतांचे अस्तित्व. Ecology आणि sustainability ची याहून अधिक व्यापक व्याख्या कोणती असू शकते? 

भूमी रापो नलो वायु: खं मनो बुद्धिरेव च

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।। 

यातून देऊळ म्हणजे देवाचे घर. म्हणूनच देवळाच्या रचनेची सर्वाधिक काळजी वास्तुशास्त्र रचनाकारांनी घेतलेली दिसते. त्यासाठी त्यांनी वास्तुपुरुष मंडळाची रचना केली. वास्तुपुरुष मंडळ आणि मानवी शरीर रचना यांचा नेमका संबंध काय आणि त्याचे देऊळ रचनेत काय योगदान आहे, हे समजून घेणे जिकिरीचे काम आहे. मानवाच्या शरीरातील सहा चक्रे  ( ऊर्जा केंद्र) आणि त्यांचा अभ्यास हे समजून घेण्यासाठी गरजेचा आहे. गीतेच्या सहाव्या अध्यायात या सहा चक्रांची माहिती आहे.  

- उज्वला चक्रदेव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT