Week Creation esakal
संस्कृती

Week Creation : सृष्टीच्या निर्मातीवेळी अशी झाली आठवड्यातील सात दिवसांची निर्मिती, जाणून घ्या सविस्तर

सृष्टीची निर्मिती होत असताना आठवड्यातील सात दिवसांची निर्मिती कशी झाली तुम्हाला माहितीये का?

सकाळ ऑनलाईन टीम

Week Creation : पृथ्वीवर मानव, जिवजंतू, जलचर असे कोट्यावधी प्राणीजीव राहतात. सृष्टीची निर्मिती कशी झाली याबाबत आपण भूगोल, इतिहासातील अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अभ्यासही केलाय. मात्र सृष्टीची निर्मिती होत असताना आठवड्यातील सात दिवसांची निर्मिती कशी झाली तुम्हाला माहितीये का? आणि याचा भोलेनाथांशी काय संबंध आहे तेही आज आपण जाणून घेऊया.

भोलेनाथांनीच आठवड्याचे सात दिवस निर्माण केले आणि प्रत्येक दिवसानुसार त्याचे मालक म्हणजे ग्रह ठरवले. भोलनाथांनी आदिकालात निर्माण केलेली ही सृष्टी आजपर्यंत तशीच आहे अशी मान्यता आहे. वार आणि ग्रह हे केवळ लोकांसाठीच नाही तर ज्योतिषशास्त्र आणि धर्माकार्यातही याचे खूप महत्त्व आहे. याचा उल्लेख शिवपुराणातील विद्येश्वर संहितेत आहे.

धार्मिक ग्रंथांनुसार, सृष्टीच्या प्रारंभी, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि दयाळू महादेवजींनी पृथ्वीच्या हितासाठी वार म्हणजेच दिवस निर्माण केले. सर्वप्रथम, त्यांनी आपल्या नावावर रविवारची कल्पना केली, जो आरोग्य प्रदान करणार आहे. यानंतर त्यांनी दुसरा वार त्यांच्या मायाशक्तीचा निर्माण केला, ज्याला आपण सोमवार म्हणतो.

जन्मातच दुर्दैवाने पीडित मुलाचे रक्षण करण्यासाठी भोलेशंकरांनी तिसऱ्या वाराची रचना केली, ज्याला मंगळवार नावाने ओळखले जाते. यानंतर आळस आणि पापातून मुक्ती देण्याच्या हेतून सर्व जगाच्या कल्याणासाठी लोकांचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूच्या नावाने वार निर्माण करण्यात आला.

सृष्टीच्या संरक्षणासाठी भोलेनाथांनी ब्रह्मदेवाचा आयुष्कारक वार निर्माण केला. यानंतर, तिन्ही लोकांच्या वाढीसाठी, प्रथम पुण्य पापांची निर्मिती केली गेली आणि नंतर भगवान शिवांनी इंद्र आणि यम या वारांची निर्मिती केली जेणेकरून कर्म करणार्‍यांना शुभ आणि अशुभ फळ प्राप्त होईल. हे दोन दिवस अनुक्रमे शुक्रवार आणि शनिवार आहेत जे आनंद देतात आणि मृत्यूचे भय दूर करतात. (Sanskruti)

प्रत्येक दिवस ठरवताना भोलेनाथांनी सूर्याला रविवारचा स्वामी बनवले तर सोम म्हणजेच चंद्र हा शक्तीशी संबंधित दिवसाचा स्वामी आहे. कुमार हा संबंधित दिवसाचा स्वामी मंगळ आहे, म्हणून या दिवसाला मंगळवार असेही म्हणतात. बुध हा इंद्रावरचा स्वामी असल्यामुळे या दिवसाला बुधवार असेही म्हणतात. ब्रह्मदेव गुरूवारचे स्वामी आहेत आणि इंद्रदेव शुक्रवारचे स्वामी आहेत यम हे शनिवारचे स्वामी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT