Janmashtami 2022: Know the reason of why Krishna not marry to radha  esakal
संस्कृती

Janmashtami 2022: 'या' कारणाने कृष्ण आणि राधाने लग्न केलं नव्हतं, काय होती कहाणी ?

जगात असे अनेक जोडपे आहेत जे राधा आणि कृष्णाच्या जोडीकडे आदर्शाने बघतात. चला तर जाणून घेऊया राधा आणि कृष्णाचे काही खास किस्से.

सकाळ डिजिटल टीम

Janmashtami 2022: देशभऱ्यात सगळीकडे आज जन्माष्टमी साजरी केली जातेय. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी दणक्यात हा उत्सव साजरा केला जातोय. जन्माष्टमीच्या अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातली एक कथा आहे ती कृष्ण आणि राधाची. कृष्ण आणि राधाने लग्न न करण्यामागचं कारण जाणून घेऊया. (Janmashtami 2022: Know the reason of why Krishna not marry to radha)

मथुरा वृंदावनच नाही तर देशातील अनेक भागात जन्माष्टमीचा उत्सव गुण्यागोविंदाने साजरा केल्या जातोय. हा सण दरवर्षीच येतो मात्र राधा आणि कृष्णाची कहाणी या जन्माष्टमीला आपण जाणून घेऊया. राधा आणि कृष्णाने कधी लग्न का केलं नाही हे जाणून घेण्यास अनेक लोक उत्सुक असतात. जगात असे अनेक जोडपे आहेत जे राधा आणि कृष्णाच्या जोडीकडे आदर्शाने बघतात. चला तर जाणून घेऊया राधा आणि कृष्णाचे काही किस्से.

पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर कसे भेटलेत कृष्ण आणि राधा

असं मानलं जातं की कृष्ण जेव्हा चार-पाच वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या वडिलांसोबत गायींना चारा घालण्यासाठी गेले होते. त्यांच्या वडिलांना चकित करण्यासाठी त्यांनी वसंत ऋतूमध्ये वादळ आणलं होतं. आणि याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे त्यांनी वडिलांना दाखवले होते. त्यानंतर अचानक पाऊस आला आणि कृष्ण रडायला लागले. ते रडत रडत त्यांच्या वडिलांना जाऊन बिलगले. त्याचवेळी एक सुंदर कन्या तिथून जात होती. त्यांच्या वडिलांनी कृष्णाला तिच्या जवळ सांभाळण्यासाठी बसवलं. आणि ते गायींना चरण्यास घेऊन गेले. तेव्हा कृष्ण त्यांच्या खऱ्या अवतारात आले. आणि त्यांनी विचारलं तुला आठवतं स्वर्गात आपण असेच बसायचो. आणि ती कन्या त्यांनी उत्तर देत हो म्हणाली. ती कन्या दुसरी कोणी नसून राधा होती. अशा प्रकारे पृथ्वीवर राधा आणि कृष्ण पहिल्यांदा भेटले होते.

असं मानलं जातं की कृष्ण आणि राधा अनेकदा वृंदावनमध्ये भेटायचे. दररोज कृष्ण ओढ्याजवळ बासूरी वाजवत असायचे आणि राधा बासूरीचा मधूर सूर ऐकताच त्यांना भेटायला यायची. मान्यतेनुसार राधा आणि कृष्ण कधीच वेगळे झाले नाही. राधा आणि कृष्णाचं नातं भक्तीचं शुद्ध स्वरूप आहे.

राधा आणि कृष्णाने का लग्न केलं नाही ?

कृष्ण आणि राधाने लग्न न करण्याचा निर्णय यासाठी घेतला होता कारण प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत असं त्यांना वाटायचं. प्रेम शारिरीक नसून भक्ती आणि शुद्धतेचं प्रतिक असतं हे जगापुढे दाखवून देण्यासाठी एकमेकांशी लग्न न करत त्यांनी भक्तीचं एक निराळं रूप जगापुढे ठेवलं होतं. तर काही मान्यतेनुसार राधा तिला स्वत:स कृष्णायोग्य समजत नव्हती त्यामुळे त्यांनी लग्न केलं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT