Janmashtami 2023 esakal
संस्कृती

Janmashtami 2023 : 2 दिवस का साजरी केली जाते कृष्ण जन्माष्टमी? स्मार्त अन् वैष्णव जन्माष्टमीमधील फरक जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे का की कृष्ण जन्माष्टमी 2 दिवस का साजरी केली जाते?

सकाळ ऑनलाईन टीम

Janmashtami 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण श्री हरी विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. यावेळीही 6 आणि 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. बुधवारी म्हणजेच 06 सप्टेंबर रोजी साधू-संन्यासी, स्मार्त पंथीय, तर वैष्णव पंथीय मंदिरांमध्ये गुरुवारी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.

असे मानले जाते की पहिल्या दिवशी साधू-संन्यासी, स्मार्त पंथीय दरवर्षी जन्माष्टमी साजरी करतात, तर दुसऱ्या दिवशी वैष्णव पंथीय हा उत्सव साजरा करतात. पण तुम्हाला माहित आहे का की कृष्ण जन्माष्टमी 2 दिवस का साजरी केली जाते? चला जाणून घेऊया स्मार्त आणि वैष्णवांची जन्माष्टमी वेगवेगळ्या दिवशी का साजरी केली जाते.

कृष्ण अष्टमीला 2 तिथी का असतात?

स्मार्त आणि वैष्णव पंथी वेगवेगळ्या तारखा असलेल्या वेगवेगळ्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतात. स्मार्त पहिल्या तारखेला जन्माष्टमी साजरी करतात आणि वैष्णव पंथीय दुसऱ्या तारखेला ती साजरी करतात.

कृष्ण जन्माष्टमी २ दिवस साजरी करण्यामागे हे आहे कारण

वैष्णव संस्कृतीत अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रानुसार जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. तर, स्मार्त सप्तमी तिथीच्या आधारावर हा सण साजरा करतात. वैष्णव भक्तांच्या मते, कृष्ण जन्माष्टमी हा सण हिंदू कॅलेंडरच्या नवमी आणि अष्टमी तारखांना येतो. हिंदू कॅलेंडरनुसार, श्री कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव रात्री उशिरा साजरा केला जातो कारण धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री उशिरा झाला होता.

जन्माष्टमी 2023 पूजेसाठी शुभ मुहूर्त

6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:02 ते मध्यरात्री 12:48 पर्यंत भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. अशा प्रकारे पूजेचा कालावधी केवळ 46 मिनिटे असेल. जन्माष्टमी व्रत सोडण्याची वेळ 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 06:09 नंतर आहे. (Festival)

या दिवशी जुळून येतोय अद्भुत योग

जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्र दिसून येतो. श्रीकृष्णाचा जन्मही रोहिणी नक्षत्रात झाला. रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 09:20 ते 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:25 पर्यंत असेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: ‘माझा स्वतःचा फोन सतत सायलेंट असतो...’; Zerodha चे संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितलं यशामागील तत्वज्ञान

Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का! निवडणूक जिंकली तरी होणार नाहीत मुख्यमंत्री; भाजपने दिला नवा फॉर्म्युला

Dhananjay Munde: लोकसभेतील राड्याचा विधानसभेवर परिणाम! निवडणूक आयोगाने धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाची हायकोर्टाला दिली 'गॅरंटी'

Congress Candidates: काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT