भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो.
भीमाशंकर मंदिराची रचना कशी आहे?
भीमाशंकर मंदिर वास्तुकलेच्या नागरा शैलीतील जुन्या आणि नवीन रचनांचे मिश्रण आहे. हे प्राचीन विश्वकर्मा शिल्पकारांनी प्राप्त केलेल्या कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन दर्शवते. हे एक अगदी साधेपणाचे परंतु सुंदर मंदिर आहे आणि ते 13 व्या शतकाचे आहे, तर 18 व्या शतकात नाना फडणवीस यांनी सभामंडप बांधला होता.असे म्हटले जाते की महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उपासना मंदिराच्या सोयीसाठी या मंदिराला पैसे दिले आहेत. या भागातील इतर शिवमंदिरांप्रमाणेच गर्भगृहही खालच्या पातळीवर आहे. आपल्या इथले बरेचसे बांधकाम नवीन दिसत असले तरी भीमाशंकर या मंदिरा उल्लेख 13 व्या शतकाच्या साहित्यात दिसुन येतो संत ज्ञानेश्वर त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते.
या मंदिराची अजून एक गोष्ट म्हणजे आजही मंदिरासमोर एक मोठी घंटा दिसते. या घंटावर येशूबरोबर मदर मेरीची मूर्ती आहे. चिमाजी आप्पा यांनी ही मोठी घंटा मंदिराला दिलेली आहे.असे सांगितले जाते की, 16 मे 1739 रोजी वसई किल्ल्यावरून चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर अशा पाच मोठ्या घंटा गोळा केल्या होत्या. आणि मग नंतर त्या घंटा त्यांनी भीमाशंकर ,वाईजवळ कृष्णा नदीच्या काठावरील शिव मंदिरासमोर, बांशंकर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि रामलिंग मंदिर येथे अर्पण केल्या होत्या.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कहाणी काय आहे ?
प्राचीन कथेनुसार, कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली, काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजे. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता.
एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधीत झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातुन स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले. युद्धमध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.