Omkareshwar Temple  Esakal
संस्कृती

ज्योतिर्लिंग: मध्य प्रदेशच्या 'मोक्ष दायिनी' म्हणून ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास काय आहे?

12 ज्योतिर्लिंगापैकी एका जरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले तर तुमचे सर्व पाप मिटतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

दिपाली सुसर

12 ज्योतिर्लिंगापैकी एका जरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले तर तुमचे सर्व पाप मिटतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आज आपण भगवान महादेवाच्या ओंकारेश्वर धाम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास पाहणार आहोत.ओंकारेश्वर धाम मध्य प्रदेशच्या मोक्ष दायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या नर्मदा नदीच्या तिरावर आहे. नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित,ओंकारेश्वरला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलीनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक 'ओम' चे स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे नाव 'ओंकारा' वरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे. मांधाता बेटांवर स्थित, ओंकारेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत. तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे.मध्य प्रदेश मध्ये स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे, जे ओम प्रतीक चिन्हाच्या आकारासारखा दिसतं. संपूर्ण परिसर डोंगरांनी वेढलेला आहे आणि ते एक अतिशय सुंदर दृश्य तयार करतं. बेटाभोवती प्रदक्षिणा अतिशय धार्मिक मानली जाते. धार्मिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून ओंकारेश्वर खूप चांगले आहे. येथे तुम्हाला बहुतेक प्राचीन मंदिरे दिसतील.

या ज्योतिर्लिंगाचे नाव 'ओंकारेश्वर' कसं पडलं?

राजा मान्धाता यांनी अपल्या प्रजेच्या हितासाठी आणि मोक्षसाठी तपस्या करुन भगवान शंकराला येथे विराजमान होण्याचा वरदान मागितला होता. त्यानंतर येथे पहाडावर ओंकारेश्वर तीर्थ ‘ॐ’च्या आकाराचं बनलेलं आहे. ॐ शब्दाचं उच्चारण सर्वप्रथम सृष्टिकर्ता विधाताच्या मुखातून झालं होतं. यासाठी या तिर्थाचं नाव ओंकारेश्वर आहे. मान्यतेनुसार, ॐ चा आकार तीर्थची परिक्रमा केल्यावर अत्यंत लाभदायक फळ आणि मोक्षची प्राप्ति होती.

संपूर्ण भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक, ओंकारेश्वर किंवा ओंकार मंधाता मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या बेटावर अनेक मंदिरे आहेत आणि ज्योतिर्लिंग ममलेश्वर मंदिर देखील आहे. हे मंदिर, त्याच्या धार्मिक मूल्यांव्यतिरिक्त वास्तुकलेसह सुंदर कोरीवकामासाठी देखील लोकप्रिय आहे.

अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधले. मंदिर तीन मजली आहे. तळाला ओंकारेश्वर, दुस-या मजल्यावर महांकालेश्वर आणि तिस-या मजल्यावर वैद्यनाथेश्वर अशी मंदिराची रचना आहे. या मंदिरासाठी तिथल्याच स्थानिक नरम दगडांचा वापर केला आहे. दगड नरम असल्यामुळे मंदिरावर अतिशय नाजूक कलाकुसर केलेली जाणवते. हे मंदिर नागर शैलीत बांधलेले असून त्यात अन्नपूर्णा व गणेशाच्या मूर्ती आहेत.

प्रत्येक महिन्यातील एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष प्रकाराने पूजा केली जाते. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. भारतात फक्त नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. या परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वरला होते. नर्मदेच्या दक्षिण तीरापासून सुरुवात करतात आणि भडोच जवळचा सागर संगमाजवळ नर्मदा पार करून अमरकंटकला वळसा घालून परत ओंकारेश्वरला येऊन या परिक्रमेची सांगता होते. असे या क्षेत्राचे महिमान आहे.

मंदिराच्या तळमजल्यावर स्थापित ज्योतिर्लिंग पाण्यात बुडालेले आहे. मंदिर सकाळी 5:00 ते रात्री 10:00 पर्यंत खुले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही', पंकजा मुंडे असं का बोलल्या? भाजपचंच राजकारण की..?

Champions Trophy 2025: 'काहीही झालं तरी स्पर्धा दुसरीकडे हलवू देऊ नका' पाकिस्तान सरकारचे बोर्डाला आदेश

Rohit Pawar : महाआघाडीच्या १७० जागा येणार निवडून; ‘स्ट्राईक रेट रेकॉर्ड’ तोडणार : रोहित पवार

Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा

Cherry Blossoms: भारतातील 'या' ठिकाणी घेऊ शकता 'चेरी ब्लॉसमचा' आनंद, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT