Krishna Janmashtami Esakal
संस्कृती

Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी कोणती प्रार्थना करावी?

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे.आणि शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल.

यंदाचा जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ?

जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी 12:05 ते 12:56 पर्यंत अभिजीत मुहूर्त राहील. दुसरीकडे, ध्रुव योग 18 ऑगस्ट रोजी रात्री 08:41 ते 19 ऑगस्ट रोजी रात्री 08:59 पर्यंत असेल. तर 17 ऑगस्ट रोजी रात्री 08:56 ते 18 ऑगस्ट रात्री 08:41 पर्यंत वृद्धी योग आहे. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर महाराष्ट्र दहीहंडी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते.

या दिवशी श्रीकृष्णाचे भक्त आपल्या प्रभूला प्रसन्न करण्यासाठी अनेक दिवस अगोदरपासून या दिवसाची तयारी सुरु करतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी, लोक भगवान श्रीकृष्णासाठी उपवास ठेवतात आणि त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच मध्यरात्री 12 वाजता त्यांची पूजा करतात. सुका मेवा, मिठाई आणि 56 प्रकारचे भोग अर्पण करतात आणि पूजेनंतर उपवास सोडतात. या दिवशी तुम्ही पूजेच्या वेळी श्री कृष्णाची विशेष प्रार्थना करुन त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. जन्माष्टमीचा दिवस भगवान श्रीकृष्णाची विशेष स्तुती करण्याचा दिवस आहे.चला तर मग पाहू या कृष्णाच्या आवडीच्या दोन खास प्रार्थना, ज्या तुम्ही जर मनापासून केल्या तर भगवान श्रीकृष्ण तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल.

चला तर मग पाहु भगवान श्रीकृष्णाला पहिली कोणती प्रार्थना करायची?

भये प्रगट कृपाला दीन दयाला,यशुमति के हितकारी,

हर्षित महतारी रूप निहारी, मोहन मदन मुरारी.

कंसासुर जाना अति भय माना, पूतना बेगि पठाई,

सो मन मुसुकाई हर्षित धाई, गई जहां जदुराई.

तेहि जाइ उठाई ह्रदय लगाई, पयोधर मुख में दीन्हें,

तब कृष्ण कन्हाई मन मुसुकाई, प्राण तासु हरि लीन्हें.

जब इन्द्र रिसाये मेघ बुलाये, वशीकरण ब्रज सारी,

गौवन हितकारी मुनि मन हारी, नखपर गिरिवर धारी.

कंसासुर मारे अति हंकारे, वत्सासुर संहारे,

बक्कासुर आयो बहुत डरायो, ताकर बदन बिडारे.

अति दीन जानि प्रभु चक्रपाणी, ताहि दीन निज लोका,

ब्रह्मासुर राई अति सुख पाई, मगन हुए गए शोका.

यह छन्द अनूपा है रस रूपा, जो नर याको गावै,

तेहि सम नहिं कोई त्रिभुवन मांहीं, मन-वांछित फल पावै.

दोहा- नन्द यशोदा तप कियो, मोहन सो मन लाय

तासों हरि तिन्ह सुख दियो, बाल भाव दिखलाय

आता पाहु या भगवान श्रीकृष्ण यांना दुसरी कोणती प्रार्थना करायची?

श्री कृष्णचन्द्र कृपालु भजु मन, नन्द नन्दन यदुवरम्

आनन्दमय सुखराशि ब्रजपति, भक्तजन संकटहरम्

सिर मुकुट कुण्डल तिलक उर, बनमाल कौस्तुभ सुन्दरम्

आजानु भुज पट पीत धर, कर लकुटि मुख मुरली धरम्

बृष भानुजा सह राजहिं प्रिय, सुमन सुभव सिंहासनम्

ललितादि सखिजन सेवहिं, लिए छत्र चामर व्यंजनम्

पूतना-तृण-शंकट-अधबक, केशि-व्योम-विमर्दनम्

रजक-गज-चाणूर-मुष्टिक, दुष्ट कंस निकन्दनम्

गो-गोप गोपीजन सुखद, कालीय विषधर गंजनम्

भव-भय हरण अशरणशरण, ब्रह्मादि मुनि-मन रंजनम्

श्याम-श्यामा करत केलि, कालिन्दी तट नट नागरम्

सोइ रूप मम हिय बसहुं नित, आनन्दघन सुख सागरम्

इति वदति सन्त सुजान श्री सनकादि मुनिजन सेवितम्

भव-मोतिहर मन दीनबन्धो, जयति जय सर्वेश्वरम्.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT