Live Tension Free Neem Karoli Baba : उत्तराखंड इथले नीम करोली बाबा हे हनुमंताचे अवतार आहेत असं मानलं जातं. असं म्हटलं जातं बाबांना वयाच्या १७ व्या वर्षीच ज्ञान प्राप्ती झाली होती. त्यांनी संपूर्ण जीवन हनुमंताच्या भक्तीतच घालवलं. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी १०८ हनुमान मंदिरांची स्थापना केली.
बाबांचे भक्त जगभरात आहेत. त्यांच्या कैंचीधाम आश्रमात जो कोणी येतो तो रीकाम्या हाती जात नाही असं म्हणतात. बाबांच्या उपदेशाने अनेकांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली आहे.
प्रत्येकच माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात. बाबांनी प्रत्येक अडचणीतून मुक्तीचा मार्ग सांगितला आहे. बरेचसे लोक हल्ली फार तणावातून जात असतात. लहान लहान गोष्टींचा ताण येतो. अशा लोकांसाठी बाबांनी काही उपाय सांगितले आहेत.
ईश्वर भक्ती - नीम करोली बाबा कोणत्याही वेळी कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यासाठी ईश्वर भक्ती हा सर्वोत्तम मार्ग समजतात. बाबा म्हणतात जोवर जीवन आहे तोवर ताण आहेतच. जीवनातून चिंता कधी संपतच नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की, आपल्याला आपलं सर्वच जीवन तणावात घालवायला हवं. बाबांच्या मते जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि जर तुम्ही चिंता करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला देवावर विश्वास नाही.
कर्म करत रहा - आपल्या नेहमी सर्व आपल्या मनाप्रमाणे हवं असतं. म्हणजे मनुष्याला तेच हवं असतं जे त्याला करावसं वाटतं. पण ज्याची इच्छा करतो ते मिळायलाच हवं असा विचार कधी करू नये. उलट जे मिळालं आहे त्यातच आपलं हित आहे, असं मानायला हवं. चांगले कर्म करत रहावे. देव जे देतो आणि करतो त्यातच आपल्या सर्वांच भलं आहे.
चिंता आणि चिंतन यात फरक - बाबा म्हणतात चिंता आणि चिंतन यात फरक आहे. चिंता नेहमी मुर्ख लोक करतात. कारण चिंता करणे हे आपलं काम नाही. आपलं काम फक्त चांगल्या कामांवर लक्ष देणं आहे. चांगले काम करण्यासाठी चिंतन नक्की करा. त्यानंतर त्याला देवावर सोडा. टेन्शन फ्री जीवनाचा एकच मूलमंत्र आहे चिंता नाही चिंतन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.