Mahashivratri sakal
संस्कृती

Mahashivratri: जाणून घ्या महाशिवरात्री उत्सवामागच्या खास गोष्टी

1 मार्च रोजी देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Importance of Mahashivratri: महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. आध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्ताची मानली जाते. यंदा 1 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. यानिमित्ताने आज आपण महाशिवरात्रीबद्दल जाणून घेऊया.

महाशिवरात्री (Mahashivratri) हा भारतातील सर्वांत पवित्र उत्सवरात्र आहे. शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस, अर्थात अमावास्येच्या एक दिवस आधी. एका वर्षात साधारण १२ ते १४ शिवरात्री असतात, या सर्व शिवरात्रींपैकी माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असते.

महाशिवरात्री-

या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात मानवी शरीर यंत्रणेत ऊर्जेला नैसर्गिक उधाण असते. पृथ्वीवरील प्रत्येक जीव आपल्यात ऊर्जेचे हे नैसर्गिक उधाण अनुभवत असतो आणि ऊर्जेच्या या नैसर्गिक उधाणाचा लाभ पाठीचा कणा ताठ आणि सरळ ठेवतात, तेच प्राणिमात्र घेऊ शकतात. मनुष्य असा एकमेव प्राणी आहे, ज्याचा पाठीचा कणा उभा आणि सरळ आहे. तुम्ही पृथ्वीवरील सगळ्या प्राणिमात्रांच्या उत्क्रांतीकडे बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल, की पाठीचा कणारहित ते पाठीचा कणा विकसित प्राणी होणे, हा उत्क्रांतीच्या टप्प्यातला सर्वांत महत्त्वाचा टप्पा. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेतला दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाठीचा कणा आडवा असण्यापासून ते उभा होण्यापर्यंतचा प्रवास. मेंदूचा खरा आणि परिपूर्ण विकास तेव्हाच होऊ शकला, जेव्हा पाठीचा कणा सरळ झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी शरीर यंत्रणेत ऊर्जेला नैसर्गिक उधाण असते, म्हणून या रात्री पाठीचा कणा ताठ, उभा ठेवण्याचे खूप फायदे आहेत.

महाशिवरात्रीचं महत्त्व-

आध्यात्मिक, संसारिक आणि महत्त्वाकांक्षी लोकांसाठी ही रात्र तेवढीच महत्त्वाची मानली जाते. जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत, म्हणजे योगीजनांसाठी या रात्री शिवशंकराच्या सर्व हालचाली लोप पावल्या आणि तो पूर्णपणे निश्चल झाला, या दिवशी त्याचा तिसरा डोळा उघडला गेला आणि त्याचे आकलन बहरून, फुलून आले. हा दिवस तुम्हाला तुमचा तिसरा डोळा उघडण्यासाठी मदत करतो, म्हणजे तुमच्यातील सखोल आकलनशक्ती खुली आणि सक्रिय करतो. ईशा योग केंद्रात दरवर्षी महाशिवरात्री लाखो लोकांच्या उपस्थितीत जल्लोषात, भव्य-दिव्य स्वरूपात साजरी केली जाते. मात्र, कोरोनामुळे या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात भाविक आणि साधक महाशिवरात्री उत्सवात ऑनलाइनच्या माध्यमातून भाग घेतील.

प्रख्यात कलाकारांच्या संगीत मैफली, सद्‍गुरुंची मध्यरात्रीची ध्यानधारणा आणि सत्संग, ‘आदियोगी दिव्यदर्शन’ हा प्रकाश आणि ध्वनीचा अनोखा थ्री डी शो असे अनेक उपक्रम यावर्षी असतील. सद्‍गुरू या वर्षी प्रथमच स्वतः रुद्राक्ष मणी ऊर्जित करणार आहेत. ‘रुद्राक्ष’ या शब्दाचा अर्थ आहे ‘शिवाचे अश्रू’. सद्‍गुरुंनी ऊर्जित केलेले दहा लाखांहूनही अधिक रुद्राक्ष जगभरातील साधकांना त्यांच्या साधनेमध्ये सहायक होईल, अशा साहित्यासह मोफत पाठवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT