Mahashivratri 2024 esakal
संस्कृती

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला व्रत करणार आहात तर ‘या गोष्टी लक्षात ठेवा, महादेव देतील इच्छित फळ

Mahashivratri 2024 : हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Mahashivratri 2024 : हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते. या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे, दरवर्षी मोठ्या थाटामाटात ही महाशिवरात्री साजरी केली जाते.

महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शिव-गौरीची विधीपूर्वक पूजा करतात. या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्व आहे. अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करायचे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

महाशिवरात्रीला अशा पद्धतीने करा व्रत-पूजा

  • महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा. त्यानंतर, महादेवांसमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तीभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा.

  • व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवांची प्रार्थना करा.

  • त्यानंतर, तुम्ही हे व्रत कसे पाळणार? म्हणजे फलाहार करणार की निर्जळी उपवास करणार, याचाही संकल्प करा.

  • संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पूजेला सुरूवात करा.

  • सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा. त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून, त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करा.

  • त्या कलशामध्ये हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, नाणे आणि फूले वाहा. त्यावर आता आंब्याची किंवा नागिणीची पाने कलशात घालून त्यावर नारळ स्थापित करा.

  • या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर-पार्वतीची मूर्ती, अथवा शिवलिंग स्थापित करा.

  • तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलंग बनवू शकता.

  • हे सर्व झाल्यानंतर, आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला.

  • त्यानंतर, एका भांड्यात केशराचे पानी मिसळून ते वाहा.

  • त्यानंतर, दिवा, धूप-अगरबत्ती लावा. भगवान शंकराला बेल, फुले वाहा.

  • आता शिवस्तुती किंवा शिवलिलामृताचे पठण करा.

  • त्यानंतर, आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त खीरेचा प्रसाद दाखवा.

  • या दिवशी रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरण ही करू शकता. हे स्तोत्र पठण करणे, अतिशय शुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

Winter Tourism : नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या उत्तराखंडमधील सात हिल स्टेशन्स तुमची वाट पाहत आहेत

SCROLL FOR NEXT