Marathi Language Day  Sakal
संस्कृती

मराठी भाषा दिन: माझ्या भाषेचा इतिहास माहितेय का?

दिपाली सुसर

मराठी ज्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाली त्यासाठी एक दीर्घ कालखंड गेला असणार. पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, वगैरे प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. आधुनिक भाषा (Language) निर्माण झाल्यावर प्राकृत भाषेतून (ग्रंथ निर्मिती होत होती इ.स. ११०० पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले असावेत. निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शैरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलली जाऊ लागली. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी (Marathi) भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर मराठी भाषा फुलत गेली.

मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास

इ. सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९८३ मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके १११०मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी 'परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।' अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी 'भागवत' ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३ व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.

मराठी भाषेतील बदल

कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत बदलत गेलेल्या वेगवेगळ्या सत्ता त्यापैकी १२५०ते १३५० या काळातील यादवी सत्ता, १६०० ते १७०० या काळातील शिवरायांचीसत्ता, १७००ते १८१८ पेशवाई सत्ता आणि १८१८ पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्‍हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी ,मराठवाडी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: 'आम्ही तुम्हाला सोडणार नाही, बँक गॅरंटी जप्त करू अन् ब्लॅक लिस्टमध्ये टाकू'; नितीन गडकरी कुणावर चिडले?

IND vs BAN 1st Test : Rishabh Pant च्या दमदार खेळीला 'ब्रेक' अन् यशस्वी जैस्वालची फिफ्टी; दोघांचं होतंय कौतुक...

Upendra Limaye : काय सांगता! अभिनेता उपेंद्र लिमये मिरवणुकीत वाजवतोय ताशा? हा व्हिडिओ पाहून नेटकरीही झिंगले

Latest Marathi News Live Updates : एकाच वेळी सर्व निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा होईल - केसरकर

प्रियकराचा बदला घेण्यासाठी एअरलाइन क्रू मेंबरला संपवलं; लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर, काजल खत्री नक्की आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT