Nag Panchami 2022 Esakal
संस्कृती

Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी का केला जातो शिराळशेठसाठी मातीचा राजवाडा?

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरगड मंदिरामध्ये आणि कडेपठार मंदिरामध्ये सक्रोबा पूजन केले जाते.

दिपाली सुसर

शिराळशेठ नेमकी काय कथा आहे?

इसवी सन 1396 ते 1408 पर्जन्यमान कमी झाल्याने दख्खन प्रदेशात बारा वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते. विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अराजक माजले होते, अन्न पाण्यावाचून लोक मृत्यूमुखी पडत होते. रयत गाव सोडून परागंदा होत होती. यावेळी शिवभक्त श्रीयाळ श्रेष्ठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले. त्याची हि दानशूर वृत्ती पाहून आदिलशाहने त्याला एक दिवसासाठी राजा केले. परंतु हर्षोल्हासाने औट घटकेतच मृत्यू पावला पण या औट घटकेत रयतेच्या हिताची अनेक कामे केली, तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठी म्हणून आजही हा दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

श्रीयाळ श्रेष्ठ चे कालौघात शिराळशेठ असा अपभ्रंश झाला, तर श्रीयाळ श्रेष्ठ शिव भक्त असल्याने सकरोबा या ग्रामीण भाषेत ओळखला जातो, त्याचेच सक्रोबा असे नामाभिधान प्राप्त झाले. श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरगड मंदिरामध्ये आणि कडेपठार मंदिरामध्ये सक्रोबा पूजन केले जाते.

त्यासाठी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी वारूळाची वाजतगाजत माती आणली जाते, ती माती पाण्याने भिजवून ठेवली जाते नंतर बांबूच्या कामठ्या वापरून राजवाडा बनविला जातो,तो त्या मातीने लिपून घेतला जातो. नंतर त्या राजवाडयाला सजवण्यासाठी वेगवेगळ्या धान्याचा वापर करतात.

राजवाडयाच्या आतील मातीच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इ. धान्ये भरून ठेवलेली असतात. त्याला गुंज, डाळी इ. साहित्यांनी सजविली जाते,आतमध्ये अन्न- धान्न्यांनी भरलेली मातीची भांडी, तसेच अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी ठेवलेली असतात. नंतर त्य राजवाड्यामध्ये मनोभावे शिवलिंगाची स्थापना केली जाते तर हवेलीच्या वरील भागामध्ये श्रीयाळची मूर्ती ठेवली जाते.गावातील विठ्ठलाच्या मंदिरातील सदरेवर आरती करून ती हवेली डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पायरी मार्गाने खाली उतरून नगर पेठेतून लेंडी ओढ्यानजीकच्या चिल्लाळाची विहीर येथे आरती करून विसर्जन केले जाते. यावेळी तरुण ढोल सनई वाजवून देवाची सेवा करतात तर पूजारी पूजेची व्यवस्था करतात.अशी ही शिराळशेठची गोष्ट या शिराळशेठला विदर्भात संकरोबा म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागातील महिला आपल्या मनातील एखादी इच्छा पुर्ण झाली की पाच वर्षे संकरोबाचा वसा घेऊन मनोभावे त्याचा राजवाडा तयार करुन आराधना केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT