Nag Panchami 2023 Wishes first monday shravan month 2023 baneshwar temple crowd pune  sakal
संस्कृती

Shravan 2023 : श्री. बाणेश्वर मंदिरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी निम्मित भक्तांच्या रांगा

मंदिरात पहाटेपासूनच होमहवन तसेच धार्मिक विधी पार पडले

शीतल बर्गे

बालेवाडी : बाणेरच्या श्री. बाणेश्वर मंदिरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी निम्मित मंदिरास फुलांची आकर्षक आरास तसेच गाभाऱ्यात नागदेवता शृंगार अशी सजावट करण्यात आली . मंदिरात पहाटेपासूनच होमहवन तसेच धार्मिक विधी पार पडले.

" हर हर महादेव" च्या गजरात परिसर दुमदुमून गेला. श्रावणी सोमवार व नागपंचमी सण एकत्र आल्याने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. बाणेरच्या तुकाई टेकडीवर इसवी सन १२०० शतकातील पांडवकाली स्वरूपात असलेले श्री बाणेश्वर मंदिर आहे.

बाणेश्वर बाणेर बालेवाडीकरांचे आराध्य दैवत आहे . गुफा स्वरुपातील मंदिरात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असून या पाण्याने बाणेश्वरास अभिषेक केला जातो. बाणेर गावात भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेस तुकाई टेकडीवर हे मंदिर असून ,यातील शिवलिंग पांडवांनी स्थापले असल्याची अख्यायिका सांगितली जाते.

या नावावरूनच बाणेर हे नाव पडले असल्याचेही बोलले जाते .श्री बाणेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून संपूर्ण श्रावण महिन्यात श्रावण मास उत्सव साजरा केला जातो .विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यानुसार (ता. २१ ऑगस्ट ) रोजी पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमीचा सण एकत्रित आल्यामुळे बानेश्वर मंदिरात भक्तांनी एकच गर्दी केली .नागपंचमी असल्यामुळे महिला ही नटून-थटून देवदर्शनाला आल्या होत्या.

नागपंचमीमुळे गाभाऱ्यामध्ये नागदेवता स्वरूपात शृंगार करण्यात आला. तसेच पहाटेपासूनच पूजापाठ , होम हवन करण्यात आले .पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले .अशी माहिती श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप वाडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT