famous snake temples Esakal
संस्कृती

Nagpanchami 2022: भारतातील 4 प्रसिद्ध सर्प मंदिरे कोणती ?

यंदाचा नागपंचमी हा सण 2 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.

दिपाली सुसर

famous snake temples: श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी आहे. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. यादिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे परिधान करुन नागदेवताची पूजा करतात.नागपंचमी पूजा विधी (Nag panchami pooja) ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी फराळ केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीला उपवास सोडला जातो. असं म्हणतात की, नागपंचमीचा उपवास हा भावांसाठी केला जातो. गरूड पुराणानुसार, नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतीमेची पूजा केली जाते.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास नागाच्या दोषांपासून (Sarp Dosh) मुक्ती मिळते, अशी प्राचीन काळापासून मान्यता आहे. यंदाचा नागपंचमी हा सण 2 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. आपल्या भारतात नागदेवतांची अनेक मंदिरे (ancient snake temple) आहेत. यातील काही मंदिरे खूप वैशिष्ट्यपुर्ण आहेत. तर काही नाग मंदिरे खूप प्राचीन आहेत. या मंदिरांमध्ये नागपंचमी आणि इतर विशेष प्रसंगी भाविक भक्तांची चांगलीच गर्दी असते. आज आपण 4 प्रसिद्ध सर्प मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत जे खूप खास आहे.

1) नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन (Nagchandreshwar Mandir)

मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या उज्जैनमध्ये नागचंद्रेश्वर मंदिर आहे. या मंदिराची विशेषतः असे आहे की हे मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सर्वप्रथम महानिर्वाणी आखाड्याचे मुख्य ऋषी मंदिराचे दार उघडून पूजा करतात. त्यानंतरच सामान्य भाविक मंदिरात प्रवेश करतात. दुसरीकडे नागपंचमीच्या रात्री हे मंदिर पुन्हा बंद केले जाते.नागचंद्रेश्वर मंदिर हे महाकालेश्वर मंदिराच्या उंच शिखरावर आहे.

2) कर्कोटक नाग मंदिर नैनिताल (Karkotak Mandir)

कर्कोटक नाग मंदिर नैनिताल येथील भीमताल येथे आहे. या मंदिराला भीमतालचा मुकुट या नावानेची ओळखले जाते. या मंदिराच्या आभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी दाट जंगलातून रस्ता काढत जावे लागते. लोक येथे येतात आणि काल सर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी विशेष प्रार्थना करतात. नागपंचमीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते.

3) वासुकीनाथ मंदिर जम्मू (Basukinath Mandir)

जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह येथे वासुकी नाथ मंदिर बांधले आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे हे मंदिर सुमारे हजार वर्षे जुने आहे. या मंदिरात दर्शनासाठी लांबून लोक येतात. या मंदिराशी संबंधित अनेक श्रद्धा आणि कथा आहेत. हे मंदिर ऋषी कश्यपाचा पुत्र आणि नागांचा राजा वासुकी याला समर्पित आहे. या मंदिरात नागांचा राजा वासुकीची मूर्ती स्थापित आहे. मंदिराजवळ एक तलाव देखील आहे ज्याला वासुकी कुंड म्हणतात.


4) धौलीनाग मंदिर उत्तराखंड (Dhaulinag Mandir)

उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यात एक जुने नाग मंदिर आहे. या मंदिराला धौलीनाग मंदिर म्हणतात. हे मंदिर विजयपूरजवळ डोंगराच्या माथ्यावर आहे. येथे दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. नागपंचमीला येथे जत्रेचेही आयोजन केले जाते, ज्यामध्ये लाखो लोक येतात आणि नाग देवतेचा आशीर्वाद घेतात. धौलीनाग हा महाभारतात उल्लेखिलेला कालिया नागाचा पुत्र असल्याचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT