Navratri 2023 esakal
संस्कृती

Navratri 2023 : महानवमी निमित्त कन्यापूजन करताय? मग जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

आज महानवमी आहे, त्यानिमित्ताने घरोघरी कन्यापूजन केले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सवाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून झाली. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये देवीची नऊ रूपांमध्ये भक्ती भावाने पूजा केली जाते. आज नवरात्रीचा ९ वा दिवस आहे. रविवारी नवरात्रीचा आठवा दिवस अर्थात अष्टमीचा दिवस पार पडला. नवरात्रौत्सवात अष्टमी आणि नवमीला विशेष महत्व असते.

नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी सर्वत्र महागौरीची पूजा केली जाते, तर नवमीच्या दिवशी देवीची माता सिद्धीदात्रीच्या रूपात उत्साहात पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी घरोघरी कन्यापूजन केले जाते.

या कन्यापूजनाला ही विशेष महत्व असते. आज महानवमीच्या दिवशी कन्यापूजनाचा मुहूर्त कधी आहे ? आणि हा विधी कसा करावा ? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

महानवमीचा मुहूर्त कधी ?

शारदीय नवरात्रौत्सवातील नववा दिवस अर्थात महानवमीच्या तिथीचा मुहूर्त हा २२ ऑक्टोबरपासून संध्याकाळी 7.58 वाजता सुरू झाला असून २३ ऑक्टोबर(सोमवारी) रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 5.44 वाजेपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. या महानवमीच्या मुहूर्तावर तुम्ही देवीची आराधना आणि पूजा अवश्य करा.

कन्यापूजनाचा मुहूर्त कधी ?

२३ ऑक्टोबरला (सोमवारी) महानवमीच्या दिवशी कन्यापूजनाचे अनेक शुभमुहूर्त आहेत. ज्यामध्ये कन्यापूजनाचा मुहूर्त सकाळी 6.27 ते 7.51 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, पुन्हा 9.16 ते 10.41 पर्यंत कन्यापूजनाचा मुहूर्त आहे.

महानवमीच्या दिवशी इतर पूजाविधी करण्यासाठी मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यामध्ये, दुपारी 1.30 ते 2.55 आणि त्यानंतर 2.55 ते 4.19 पर्यंत इतर पूजा मुहूर्त असणार आहे. विशेष म्हणजे आज रवि योग राहील, ज्यामध्ये कन्यापूजन तुम्हाला केव्हाही करता येईल.

महानवमीला कन्यापूजनाचा विधी कसा करावा ?

महानवमीच्या दिवशी कन्यापूजनासाठी मुलींना बोलावले जाते. या महानवमीला घरी येणाऱ्या मुलींवर फुलांचा वर्षाव केला जातो. हा फुलांचा वर्षाव करून त्यांचे उत्साहाने स्वागत करा. यावेळी नवदुर्गेच्या ९ रूपांचा जप करा आणि देवीचा गजर करा.

त्यानंतर, मुलींना त्यांचे पाय दूधाने भरलेल्या ताटामध्ये ठेवायला सांगा. त्यानंतर, तुमच्या दोन्ही हातांनी त्यांचे पाय धुवा. त्यानंतर, मुलींचे पाय स्वच्छ कापडाने पुसा आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आशिर्वाद घ्या.

मुलींच्या कपाळावर अक्षता, फुले आणि कुंकू लावा. त्यानंतर, देवीचे ध्यान करून या मुलींना तुमच्या इच्छेप्रमाणे पदार्थ बनवून त्यांना जेवायला वाढा.

या जेवणात तुम्ही गोड पदार्थ, पुरणपोळी किंवा चपाती आणि हरभरऱ्याची उसळ वाढू शकता. मुलींचे जेवण झाल्यानंतर त्यांना तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा आणि काही भेटवस्तू द्या. त्यानंतर, त्यांचे आशिर्वाद घ्या. अशा प्रकारे हा कन्यापूजनाचा विधी पूर्ण करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT