ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनासाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बेळगाव : नवरात्रीनिमित्त (Navratri Festival) सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या (Saundatti Renuka Devi) दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे परिसर गर्दीने फुलून जात असून, दर्शनासाठी दोन ते तीन तास भाविकांना रांगेत थांबावे लागत आहे.
नवरात्रीमध्ये दर्शनासह तेल वाहण्यासाठी भाविक दरवर्षी सौंदत्ती (Yellamma Temple) डोंगरावर मोठी गर्दी करतात. पहिल्या दिवसापासून देवीची पूजा करून दररोज आकर्षक आरास केली जात असून, पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी डोंगरावर दाखल होत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
मात्र, विशेष दर्शनासाठी रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे अनेक भाविक मोफत दर्शनाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या रांगेतून दर्शनासाठी अधिक वेळ लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनासाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे दर्शन लवकर होत असून, दररोज लाखो भाविक दर्शन घेत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. दर्शनासह वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची खरेदी होत असल्याने दररोज कोट्यवधीची उलाढाल होत आहे. विजयादशमीपर्यंत दररोज गर्दी होणार असल्याने पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
महिलांना मोफत बसप्रवास करण्याची संधी असल्याने महिला वर्ग बसने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाच्या सौंदत्ती डोंगराकडे जाणाऱ्या बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.