Banashankari Devi in Belgaum esakal
संस्कृती

Navratri Festival : बदामीनंतरचे मूळ देवीपीठ 'बनशंकरी'; मंदिराला तब्बल 200 वर्षांपूर्वीचा इतिहास, जंगलात सापडली देवीची मूर्ती!

बेळगावात बनशंकरी देवीची ६ मंदिरे आहेत.

गिरीश कल्लेद

पूर्वी हे मंदिर काळ्या कौलांचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्यांदा १९८५ मध्ये करण्यात आला.

बेळगाव : श्री बनशंकरीदेवीचे (Banashankari Devi) मूळ नाव शाकंभरी असून कर्नाटकातील बदामी येथील देवीचे मुख्य मंदिर (Badami Temple) आहे. विशेषतः देवांग समाजाची ती आराध्य देवता आहे. बेळगावात बनशंकरी देवीची ६ मंदिरे असून, त्यापैकी सर्वात पुरातन हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील बनशंकरी मंदिर नावलौकिक पावलेले आहे.

सदर मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. बदामीनंतर हे मंदिर मूळ देवीपीठ मानले जाते. या देवीच्या मूर्तीविषयी काही वैशिष्ट्ये सांगितली जातात. ही मूर्ती स्वयंभू असून, चतुर्भुज आहे. हातात खडग, डमरू, कुंकू व त्रिशूल आहे. ही मूर्ती बदामीजवळील जंगलात सापडली. त्यामुळे ती इथे कोणी आणली, शिल्पकार कोण याविषयीचे गूढ कायम आहे.

तिची स्थापना शहापुरात करण्यात आली, त्यावेळी कोणी पुढाकार घेतला, त्यांची नावेही लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत. मात्र, इथल्या भाविकांनीच ती मूर्ती बदामी येथून आणून स्थापन केलेली आहे. मूर्ती एकाच गहूवर्णी पाषाणात कोरलेली आहे. ती व्याघ्रारुढ असून मूर्तीवर दोन द्वारपाल, व्याघ्रमुख अत्यंत रेखीवपणे कोरलेली आहेत.

मूर्ती साधारण साडेतीन फूट उंच आहे. त्याकाळी धार्मिक वृत्तीच्या पटवर्धन सरकारांनी आपल्या कारकिर्दीत शहापूर पंचक्रोशीत विविध मंदिरांसाठी दानधर्म केला. काही मूर्तींच्या स्थापनेत स्वतः पुढाकार घेतला तर काही समाज मंदिरांसाठी जागा दान दिली. बनशंकरी मंदिरासाठी तत्कालिन पोलिसपाटील एस. आर. पाटील यांच्याकरवी काही जागा देणगी म्हणून दिली आहे.

पूर्वी हे मंदिर काळ्या कौलांचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्यांदा १९८५ मध्ये करण्यात आला. ठकाप्पा मग्गावी, एन. के. मग्गावी, नागप्‍पा मग्गावी, चाळप्पा बेकवाड यांनी १९५२ मध्ये ट्रस्ट स्थापन केला. वीरभद्रप्पा मग्गावी, यशवंतराव हणबरट्टी, टी. बी. मग्गावी, हंपाण्णा सुळधाळ, सी. बी. बेकवाड आदींनी १९८५ मध्ये जीर्णोद्धार केला. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा मंदिराचे जीर्णोद्धार काम हाती घेण्यात आले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मूर्तीच्या मागे आकर्षक प्रभावळ आहे. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

सध्या दररोज कलावती आईंच्या भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. विजयादशमीदिनी शहापूर भागात देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते. बदामी बनशंकरी देवीच्या यात्रेदिवशी पौष (जानेवारी) महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी या देवीची यात्रा होत असते. दर शुक्रवारी आणि पौर्णिमेदिवशी दर्शनासह ओटी भरण्यास मंदिरात गर्दी असते. मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आनंदकुमार लठ्ठे, उपाध्यक्ष तुकाराम अमाशी, सचिव प्रसन्नकुमार कुलगोड यांच्यासह रवी मग्गावी, अशोक हणबरट्टी, किरण बेकवाड आणि रमाकांत तुगशेट्टी ट्रस्टी आहेत.

गेल्या ७ वर्षांपासून मंदिरात पूजा, धार्मिकविधी करत आहे. मंदिर जागृत असून, केवळ देवांग समाज बांधव नव्हे, तर शहापूर, वडगाव, बेळगावसह मुंबई, पुणे, इचलकरंजी, गोवा येथून भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात.

-प्रल्हादस्वामी देवांगमठ, पुजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT