गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्रौत्सवाची लगबग सुरू झाली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रौत्सव 27 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 5 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना म्हणतात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांशी संबंधित अनेक परंपरा प्रचलित आहेत. या कालावधीत अखंड नंदादीपही तेवत ठेवतात.
प्रत्येकाची इच्छा असते, की देवीची पूर्ण भक्तीने पूजा करावी, जेणेकरून कुटुंबात सुख आणि शांती राहील. लहानपणापासून नवरात्री पाहणाऱ्या आपण सर्वांना नवरात्र का साजरे करतात, ते नऊ दिवसाचेच का असते, वर्षातून कितीवेळा नवरात्र असते, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. नवरात्री संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
नवदुर्गा कोण आहे
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री ही नवदुर्गेची रूपे आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात या देवींचा जागर केला जातो.
नवरात्र का साजरे करतात
या मागील 2 कारणे आहेत पहिले असे की आई दुर्गेचे महिषासुराशी 9 दिवसापर्यंत युद्ध चालले होते आणि 10 व्या दिवशी त्यांनी असुराचं वध केले होते, म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. रामायणानुसार, याच दिवशी प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे दसरा उत्साहात साजरा केला जातो.
वर्षातून चार वेळा येते नवरात्री
वर्षात चार नवरात्र साजरे केले जातात. या चारपैकी दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्र असतात. पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येते तर, दुसरे नवरात्र अश्विन महिन्यात येते. चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जाते. आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र म्हणतात.
नवरात्र नऊ दिवसच का
चैत्र आणि अश्विनच्या नवरात्राच्या वेळी ऋतूमान बदलते. आपल्या ऋषी-मुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या दोन मुख्य ऋतूंच्या मिलनाचा काळाला नवरात्र म्हटले. जर का आपण त्या 9 दिवसात म्हणजे वर्षाचे 18 दिवस अन्न त्याग करून भक्ती केल्याने आपले मन आणि शरीर वर्षभर निरोगी आणि शांत राहते, असा समज आहे.
शास्त्रामध्ये 9 अंकानंतर कोणता अंक नाही. या अंकाला महत्त्वाचे स्थान आहे. ब्रम्हांडामध्ये देखील 9 ग्रह असतात. म्हणून साधना देखील 9 दिवसाची मानतात. नवरात्राच्या या 9 दिवसांमध्ये 7 दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जातो. 8 व्या दिवशी शक्तीची पूजा करतात. 9 व्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असतो.
नवरात्री आणि नवशक्ती
आई पार्वती, शंकरजींना प्रश्न करतात की 'नवरात्र कशाला म्हणतात !' शंकरजी त्यांना समजावतात नव शक्तिभि: संयुक्त नवरात्रं तदुच्यते, एकैक देव-देवेशि! नवधा परितिष्ठता. म्हणजे नवरात्र हे नऊ शक्तींनी जोडले आहे. याचा प्रत्येक तिथीला प्रत्येक शक्तीची उपासना करण्याचा कायदा आहे.
रात्रीचे महत्त्व
नवरात्र या शब्दाचा अर्थ म्हणजे 'नव अहोरात्राची प्राप्ती, रात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे. भारतातील प्राचीन ऋषी-मुनींनी रात्रीला अधिक महत्त्व दिले आहे. हेच कारण आहे की दिवाळी, होळी, शिवरात्र आणि नवरात्रीचे सण रात्रीच साजरे करतात.
मनातली इच्छा पूर्ण होते
पुराणानुसार या 9 दिवसात जे अन्नाचा त्याग करून देवी आईची भक्ती किंवा ध्यान करतं, देवी आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. किंवा जे संकल्प घेऊन नऊ दिवस पूजा ध्यान करत, त्याचे संकल्प देखील पूर्ण होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.