pune to pandharpur ashadi wari vitthal rukmini cycle rally of Harishchandra Kanade  sakal
संस्कृती

Pandharpur Cycle Rally : पुणे ते पंढरपूर हरिश्चंद्र कानडे यांनी केली ‘सायकल वारी’

विठोबा माऊलीच्या दर्शनाचा आनंद काय वर्णावा? सारा शीण कुठल्याकुठे पळाला.

- नीला शर्मा

Pandharpur Cycle Rally : हरिश्चंद्र कानडे हे नुकतेच (सात जूनला) सायकलवरून पंढरपुरी जाऊन आले आहेत. त्यांचे वय चौऱ्याहत्तर आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. सायकलवरून अशा मोठ्या मोहिमा करण्याची सुरवात त्यांनी वर्षभरापूर्वीच केली आहे.

कानडे म्हणाले, ‘‘दररोज सायकलने मोठी फेरी करण्याचा सराव सुरू आहे. काही समविचारी मित्रांच्या म्हणण्यानुसार आम्ही पुणे ते पंढरपूर सायकल वारी करण्याचे पक्के केले. आमच्यातील प्रकाश टेंभेकर यांनी सर्व नियोजन अचूक केले. त्यांना अशा मोहिमांचा अनुभव असल्याने बारीकसारिक तपशिलासह त्यांनी आखणी केली.

त्यानुसार पुढील व्यवस्थापनही नेमकेपणाने पार पडत राहिले. मी पिंपळे सौदागरला राहतो. पुण्यातील प्रभात रस्त्यावरील खुणेच्या जागी, ठरल्यावेळी चौतीस- पस्तीसजण जमले. तेथून पहाटे चार वाजता आम्ही आपापल्या सायकलवरून निघालो. हडपसरला पाच-सहाजण येऊन मिळाले. असा सुमारे चाळीस सायकलस्वारांचा ताफा पुढच्या दिशेने निघाला.’’

कानडे यांनी सांगितले की, आमच्यात वय वर्षे पंचेचाळीस ते सत्त्याहत्तरपर्यंतचे स्त्री - पुरुष होते. साधारण पंधरा किलोमीटर अंतर पार केल्यावर दहा मिनिटांची विश्रांती आम्ही घेत होतो. यात पाणी, चहा घेऊन पुढच्या वाटचालीसाठी ऊर्जा मिळवत होतो. दुपारी इंदापूरला जेवणासाठी थांबलो.

त्यानंतर दर दहा ते बारा किलोमीटर अंतरावर कडक ऊन असल्याने थांबत राहिलो. टेंभुर्णीला थांबलो तेव्हा, पंढरपूर आटोक्यातल्या टप्प्यात आल्याने उत्साह वाढला. हे छत्तीस किलोमीटरचे अंतर जास्तच खडतर वाटले. कारण अंधार पडला होता आणि रस्ताही सुरळीत नव्हता. आठच्या सुमाराला आम्ही पंढरपुरात दाखल झालो. तेथील विठोबा माऊलीच्या दर्शनाचा आनंद काय वर्णावा? सारा शीण कुठल्याकुठे पळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT