Ram Navami 2024 esakal
संस्कृती

Ram Navami 2024 : आज रामनवमी.! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व अन् पूजेची पद्धत

Know all about Rama Navami Festival in Marathi: मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Ram Navami 2024 : मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये रामवमीला विशेष असे महत्व आहे. वैदिक पंचांगानुसार, रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता.

विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे. या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते. यंदा रामनवमी १७ एप्रिल २०२४ ला देशभरात साजरी केली जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. तसेच, श्रीराम यांच्यासोबत, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते. आज रामनवमीनिमित्त आपण शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत. (Chaitra Ram Navami 2024 Date)

रामनवमीचा शुभ मुहूर्त

आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. वैदिक पंचांगाच्या गणनेनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी १६ एप्रिलला दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी १७ एप्रिलला दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे, उदयतिथीच्या आधारे १७ एप्रिलला (बुधवारी) रामनवमीचा सण साजरा केला जाईल.

रामनवमीचा शुभ मुहूर्त हा बुधवारी १७ एप्रिलला सकाळी ११ वाजून ३ मिनिटांनी ते दुपारी १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही प्रभू श्रीरामांची पूजा करू शकता. रामनवमीच्या एकूण पूजेसाठीचा हा वेळ २ तास ३५ मिनिटांचा असणार आहे. (ram navami shubh muhurat)

पूजा करण्याची पद्धत

  • रामनवमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे.

  • स्नान केल्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान करा आणि प्रभू श्रीरामांचे ध्यान करा.

  • तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून घ्या.

  • आता त्या मूर्तीला किंवा फोटोला फुले वाहा, अगरबत्ती, धूप लावा.

  • त्यानंतर, रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून रामचरित मानसचे किंवा रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करा.

  • या दिवशी प्रभू श्रीरामांचे ध्यान केल्याने आणि रामचरित मानस, रामरक्षाचे पठण केल्याने मानसिक शांती मिळते, अशी मान्यता आहे.

  • जर या दिवशी तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही किमान १०८ वेळा प्रभू श्रीराम नामाचा जप करू शकता. (How to perform puja on ramnavami)

रामनवमीचे महत्व

प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला आणि त्यांच्या नावाने ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात रामनवमीचे विशेष असे महत्व आहे. आपल्या लोकांप्रती असलेली निष्ठा, चारित्र्य, वचने पाळण्याची जिद्द आणि समर्पण यामुळे, प्रभू श्रीरामांना पुरूषोत्तम दर्जा प्राप्त झाला होता, त्यामुळे, तर त्यांना ‘आदिपुरूष’ असे ही म्हटले जाते.

मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीराम हे धैर्य, सहनशीलता, नितिमत्ता, निष्ठा आणि श्रद्धा यांचे प्रतिक आहे. त्यामुळे, प्रभू श्रीरामांचे स्मरण करून त्यांचे गुण स्वत: मध्ये बिंबवले पाहिजेत, हाच संदेश रामनवमीचा सण आपल्याला देतो. (Importance of ramnavami)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT